कर्नाटकच्या हुबळी शहरात पोलीस स्टेशनवर जमावाची दगडफेक

दगडफेकीत 12 पोलीस जखमी, आतापर्यंत 46 आरोपींना पकडण्यात यश
Police Station
Police StationDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात असलेल्या जुन्या हुबळी पोलिस स्टेशनवर शनिवारी रात्री अचानकपणे जमावाने दगडफेक केली. यामध्ये 12 पोलिस जखमी झाले असून त्यापैकी 2 पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. दगडफेकीनंतर कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत 46 जणांना ताब्यात घेतलं असून गुन्हे दाखल करण्याचं काम सुरु आहे. (Stone pelting at police station in Hubli Karnataka)

Police Station
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केल्याने 36 काँग्रेस नेत्यांविरुद्ध एफआयआर

एनआयच्या (ANI) वृत्तानुसार, सोशल मीडियावर (Social Media) एक प्रक्षोभक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यावरून संतप्त झालेल्या जमावाने आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. दगडफेकीच्या घटनेनंतर सध्या संपूर्ण हुबळी शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त लभू राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांवर 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा तपास सुरू आहे.

Police Station
प्रशांत किशोर देणार का काँग्रेसला नवसंजीवनी?

कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "पोलीस स्टेशनवर झालेला हा कदाचित संघटित हल्ला आहे." राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सुमारे एक हजार लोक पोलिस स्टेशनवर (Police Station) हल्ला करण्यासाठी जमले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हल्ल्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी यांनीही दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला आहे. “कर्नाटक हे शांतताप्रिय राज्य आहे. आम्ही कर्नाटकचे केरळ, पश्चिम बंगाल किंवा काश्मीर होऊ देणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com