Shrikant Tyagi: शिवीगाळ करणाऱ्या श्रीकांत त्यागीसह 3 साथीदार पोलिसांच्या ताब्यात

एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या श्रीकांत त्यागीला पोलिसांनी अटकेत घेतले आहे.
Shrikant Tyagi Arasted
Shrikant Tyagi ArastedDainik Gomantak
Published on
Updated on

एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या श्रीकांत त्यागीला (Shrikant Tyagi) पोलिसांनी अटकेत घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत त्यागीला मेरठमधून अटक करण्यात आली. श्रीकांत त्यागी चार दिवसांपासून फरार होता तसेच नोएडा पोलिसांनी श्रीकांत त्यागीला अटक केली. श्रीकांत त्यागी यांच्यावर नोएडामध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस मोठ्या जिद्दीने श्रीकांत त्यागीचा शोध घेत होते तसेच मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत आणखी तीन जणांनाही पोलिसांनी अटकेत घेतले आहे. (Srikant Tyagi the tortfeasor along with three accomplices are in police custody)

Shrikant Tyagi Arasted
SC चा मोठा निर्णय, 'जिल्हा स्तरावर अल्पसंख्याकांची ओळख पटवणे कायद्याच्या विरोधात'

याआधी नोएडा पोलिसांनी महिलेसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या श्रीकांत त्यागीच्या पत्नीला पुन्हा चौकशीसाठी देखील बोलावले होते. आरोपीची पत्नी मनू त्यागी हिला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांतने पत्नीला फोन केला होता आणि पोलिस पत्नीला तिचे ठिकाण आणि संभाषण याबाबत विचारपूस देखील करत होते. त्याला 48 तासांत अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते आणि त्यानंतर आता त्याच्या अटकेचे प्रकरण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सोमवारी एका समाजातील महिलेसोबत असभ्य वर्तनाचा आरोप असलेल्या श्रीकांत त्यागीला अटक करण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले. 93-बी येथील ग्रँड ओमॅक्स सोसायटीत राहणारा त्यागी हा घटनेनंतर पळून गेल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले होते. त्यानंतर फेज-2 पोलिस स्टेशनने त्याच्या अटकेवर हे बक्षीस जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com