श्रीलंकन नौदलाने तामिळनाडूतील 37 मच्छिमारांना पकडले; स्टॅलिन यांनी परराष्ट्रमंत्र्यांना लिहिले पत्र

37 Tamil Nadu Fishermen: श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूतील 37 मच्छिमारांना पकडले.
Sri Lankan Navy Arrests 37 Tamil Nadu Fishermen
Sri Lankan Navy Arrests 37 Tamil Nadu FishermenDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lankan Navy Arrests 37 Tamil Nadu Fishermen: श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूतील 37 मच्छिमारांना पकडले. त्यांच्या पाच बोटी श्रीलंकेच्या जलक्षेत्रात घुसल्याच्या आरोपावरुन जप्त केल्या आहेत. मत्स्यपालन अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

शनिवारी रात्री श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या कारवाईदरम्यान या लोकांना पकडण्यात आले. या महिन्यातच श्रीलंकेच्या नौदलाने 64 मच्छिमारांना पकडले.

दरम्यान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्राकडे हा मुद्दा उपस्थित केला असून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सर्व मच्छिमार आणि त्यांच्या बोटींची सुटका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, शनिवारी श्रीलंकेच्या (Sri Lanka) नौदलाने 37 भारतीय मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह पकडले याकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले मच्छीमार उपजीविकेसाठी पूर्णपणे मासेमारीवर अवलंबून आहेत आणि या सततच्या अटकेमुळे मच्छिमार बांधवाना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Sri Lankan Navy Arrests 37 Tamil Nadu Fishermen
Tamil Nadu: विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 9 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

रविवारी जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात स्टॅलिन म्हणाले की, ''श्रीलंकन ​​नौदलाच्या अशा कृतींमुळे राज्यातील मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. मला हे सांगायचे आहे की भारत सरकारने (Government) आमच्या मच्छीमारांच्या हक्कांसाठी अधिक आवाज उठवला पाहिजे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.''

Sri Lankan Navy Arrests 37 Tamil Nadu Fishermen
Tamil Nadu: तामिळनाडूत राजकीय भूकंप, भ्रष्टाचाराचा आरोप करत राज्यपालांनी केली सेंथिल बालाजी यांची हकालपट्टी

मुख्यमंत्र्यांनी पाल्क खाडी क्षेत्रातील भारतीय मच्छिमारांच्या पारंपारिक मासेमारीच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, अटक आणि बोटींची जप्ती रोखण्याची वारंवार मागणी करुनही श्रीलंकन ​​नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक करणे सुरुच ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com