धास्ती वाढली: कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.26 टक्क्यांवर

आज अखेर देशात एकूण कोरोना रुग्ण संख्या 4 कोटी 32 लाखावर
Corona is rampant in Maharashtra
Corona is rampant in MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

देशात नवा व्हेरियंट असणाऱ्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याचे रुप ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले आहे. (spread of corona in the country will not stop )

गेल्या काही महिन्यात अटोक्यात आलेला हा कोरोना परत डोके वर काढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोनामुळे देशात पुन्हा कोरोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी नुकतच व्यक्त केली आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण दहा दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ंणांची संख्या वाढू लागली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही वाढत आहे.10 जून रोजी दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% टक्केवर पोहचला आहे.

31 मार्च रोजी 0.64% टक्के होता. भारतात 7,584 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर 24 रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर 3,791 जणांनी कोरोनावर मात केली होती. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 32 लाख 5 हजार 106 झाली आहे. देशात आतापर्यंत चार कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पाच लाख 24 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

Corona is rampant in Maharashtra
''दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या लहान लाटा येऊ शकतात''

दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी देशात दैनंदिन 2,338 नवे रुग्ण आढळले होते. तर सक्रिय रुग्णांची संख्या 17,883 इतकी होती.. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.64% इतकी होती. आता दहा जून रोजी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 7,584 इथकी झाली आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% इतका झाला आहे. देशात झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दहा दिवसांत तब्बल तीनपट रुग्णांची संख्या वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com