सपा नेते आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

जमीन हडप केल्याप्रकरणी सपा नेते आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
SP leader Azam Khan
SP leader Azam KhanDainik Gomantak
Published on
Updated on

समाजवादी पक्षाचे बलाढ्य नेते आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. मात्र, त्यांची तात्काळ सुटका होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे, आझम 2020 च्या सुरुवातीपासून तुरुंगात आहेत. गेल्या काही वर्षांत यूपी पोलिसांनी त्यांच्यावर 88 गुन्हे दाखल केले आहेत. यातील 86 प्रकरणांमध्ये त्यांना आधीच जामीन मिळाला होता. मंगळवारी, आझम यांना 87 व्या प्रकरणात जामीन मिळाला, परंतु काही दिवसांपूर्वी यूपी पोलिसांनी त्यांच्यावर 88 वा गुन्हा दाखल केला.

SP leader Azam Khan
आता देशात होणार डिजिटल जनगणना - अमित शाह

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आझम खान रामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते, त्याच वर्षी त्यांनी तुरुंगात असताना विधानसभा निवडणूकही लढवली आणि जिंकले. समाजवादी पक्षाच्या प्रमुख मुस्लिम नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर आझम यांच्यावर बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com