Thalapathy Vijay On CAA: "CAA लागू करणे मान्य नाही," विजयचे तामिळनाडू सरकारला पत्र

Tamilnadu CAA: देशातील सर्व नागरिक सामाजिक सलोख्याने राहतात अशा वातावरणात भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (CAA) सारखा कोणताही कायदा लागू करणे मान्य नाही.
Thalapathy Vijay
Thalapathy VijayDainik Gomantak
Published on
Updated on

Thalapathy Vijay Against CAA:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची घोषणा केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी CAA हा भाजपच्या जाहीरनाम्याचा अविभाज्य भाग होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी तो लागू केला.

आता दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयने यावर नाराजी व्यक्त करत हे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, 2019 लागू केल्यानंतर तमिळ अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचा प्रमुख थलापथी विजय याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला केला.

अभिनेत्याने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा अस्वीकार्य असल्याचे म्हटले आणि तामिळनाडू सरकारला राज्यात त्याची अंमलबजावणी करू नये अशी विनंती केली आहे.

Thalapathy Vijay
CAA: नागरिकत्व अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू, ही कागदपत्रे मिळवून देणार भारताचे नागरिकत्त्व

विजयने त्याच्या पक्षाच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या अधिकृत X खात्यावर अधिकृत पत्र पोस्ट केले आहे.

विजयने तमिळमध्ये लिहिले की, "देशातील सर्व नागरिक सामाजिक सलोख्याने राहतात अशा वातावरणात भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (CAA) सारखा कोणताही कायदा लागू करणे मान्य नाही. या कायद्यामुळे देशाचे नुकसान होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी."

Thalapathy Vijay
मोदी सरकारला आव्हान! CAA विरोधात मुस्लिम लीग सुप्रीम कोर्टात, स्थगितीसाठी केली याचिका

तमिळनाडूमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही याची काळजी घेण्याची विनंतीही अभिनेत्याने तामिळनाडू सरकारला केली आहे.

या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी थलपथी विजयने अधिकृतपणे त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com