India vs Pakistan: इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली! पाकिस्तानविरुद्ध 'स्मृती' ठरली फेल; अजून वाट पाहावी लागणार

Smriti Mandhana Wicket: पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात करताना स्मृती मानधना हिने 32 चेंडूंचा सामना करत 23 धावा केल्या.
 Smriti Mandhana Wicket
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Mandhana Record: महिला विश्वचषक 2025 स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिला लवकर गमावले, ज्यामुळे टीम इंडियाला पहिला धक्का बसला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने संघात बदल करताना अमनजोत कौरच्या जागी रेणुका सिंह ठाकूर हिला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले.

मानधनाला लवकर माघारी परतावे लागले

पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात करताना स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने 32 चेंडूंचा सामना करत 23 धावा केल्या. तिच्या या खेळीत चार चौकारांचा समावेश होता. मात्र, ती पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिच्या गोलंदाजीवर चुकली.

  • फातिमा सना हिच्या चेंडूवर मानधना पायचीत (LBW) झाली. मैदानावरील पंचांनी तिला बाद ठरवल्यानंतर तिने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

  • हा रिव्ह्यू भारतासाठी निष्फळ ठरला, कारण तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला आणि मानधनाला 23 धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

मानधनाने जर या सामन्यात आणखी 12 धावा केल्या असत्या, तर ती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनू शकली असती, पण ती थोडक्यात या विक्रमापासून वंचित राहिली.

 Smriti Mandhana Wicket
Ind vs Pak: "खेळात राजकारण येता नये" आशिया कप ट्रॉफीच्या वादावर एबी डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण, पाकड्यांची बाजू घेत म्हणाला...

विश्वविक्रमासाठी फक्त 12 धावांची गरज

स्मृतीने वर्ष 2025 मध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वात छाप सोडली. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतके झळकावली. तिने 2025 या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत एकूण 959 धावा केल्या आहेत. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या ब्लेंडा क्लार्क हिच्या नावावर आहे. क्लार्कने 1997 मध्ये एकूण 970 धावा केल्या होत्या.

मानधनाला हा 28 वर्षे जुना विश्वविक्रम मोडण्यासाठी आता केवळ 12 धावांची गरज आहे. विश्वचषकात भारताचे (India) अजून अनेक सामने बाकी असल्याने, मानधना येत्या काही सामन्यांत हा विश्वविक्रम सहज मोडेल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

 Smriti Mandhana Wicket
IND vs PAK Final 2025: हाय-होल्टेज फायनलमध्ये अभिषेक शर्माच्या निशाण्यावर दोन मोठे रेकॉर्ड; 'इतक्या' धावांनी होणार 'विक्रमादित्य'!

मानधनाच्या नावावर 13 आंतरराष्ट्रीय शतके

स्मृतीने 2013 मध्ये भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती संघाची एक महत्त्वाची खेळाडू आहे. तिने आतापर्यंत 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 4919 धावा केल्या आहेत, ज्यात 13 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com