

Smriti Mandhana wedding news: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने इंस्टाग्रामवर तिच्या खासगी आयुष्याबद्दल सुरू असलेल्या अनेक आठवड्यांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्यासोबतचा विवाह रद्द झाला असल्याची पुष्टी तिने केली आहे.
रविवारी (दि.७) इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्मृती मानधनाने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या अफवांवर आपले पहिले अधिकृत मत व्यक्त केले. स्टोरी शेअर करत ती म्हणाली, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत, त्यामुळे या वेळी बोलणे महत्त्वाचे वाटते. मी एक प्रायव्हेट व्यक्ती आहे, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की हे लग्न रद्द झाले आहे."
स्मृतीने चाहते आणि प्रसारमाध्यमांना दोन्ही कुटुंबांना पुढे जाण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले आहे. "मला हे प्रकरण इथेच संपवायचे आहे आणि आपण सर्वांनीही तसेच करावे. कृपया या कठीण काळात दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीने यातून सावरण्याची संधी द्या," अशी विनंती तिने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधना पालाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्याचा चर्चा होत्या. ऐन लग्नात तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते, मात्र याच दरम्यान पालाश मुच्छलने स्मृतीला फसवल्याच्या चर्चांना उधाण आले होते, आता म्हणूनच हे लग्न रद्द झाले आहे की काय? हा प्रश्न मात्र कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.