ऑफिसमध्ये कर्मचारी अर्धा तास झोपू शकतात, भारताच्या या कंपनीने केली घोषणा

कंपनीने कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून केली घोषणा
sleep for 30 minutes inside office wakefit solution company initiative
sleep for 30 minutes inside office wakefit solution company initiative Danik Gomantak
Published on
Updated on

कर्मचारी आता कार्यालयात 30 मिनिटे झोपू शकणार आहेत. भारतीय स्टार्टअप कंपनी वेकफिट सोल्युशनने याची सुरुवात केली आहे. झोपण्याची अधिकृत वेळही घोषित करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्यालयात झोपण्याची संधी मिळेल. (sleep for 30 minutes inside office wakefit solution company initiative)

वेकफिट सोल्युशनने नुकतीच ही अनोखी मोहीम सुरू केली आहे (दररोज कर्मचाऱ्यांसाठी 30 मिनिटांची डुकली). यामुळे त्यांचे कर्मचारी निरोगी राहतील असा कंपनीचा दावा आहे.

वेकफिट सोल्युशन ही एक स्लीप सोल्यूशन कंपनी आहे. अशा परिस्थितीत, कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, ती देखील त्यांच्या ब्रँडशी जुळते.

sleep for 30 minutes inside office wakefit solution company initiative
गुजरातमध्ये लाऊडस्पीकर वादावरून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

कंपनीने ईमेल पाठवून घोषणा केली

वेकफिट सोल्युशनने या घोषणेबाबत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. कंपनीचे सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी घोषणा केली की आता कर्मचारी दुपारी 2 ते 2:30 दरम्यान झोपू शकतील.

चैतन्यने दुपारच्या झोपेशी संबंधित अभ्यासाचाही हवाला दिला. ते म्हणाले की, दुपारी झोपल्याने शारिरीक तंदुस्त सुधारते. यावेळी त्यांनी नासाच्या अभ्यासाचा आणि हॉवर्डच्या अभ्यासाचा दाखला दिला. त्यानुसार, '26 मिनिटांच्या झोपेने काम करताना कामगिरी 33 टक्क्यांनी सुधारते.' कंपनीने ट्विटर आणि फेसबुकवर याची घोषणा केली असून झोपण्याच्या वेळेचे नियमही जारी केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com