दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील आणि आई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चंदीगडमध्ये भेट घेतली. ही बैठक 10 ते 15 मिनिटे चालली. मुसवाला यांच्या कुटुंबीयांनी शाह यांच्याकडे या हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. (Sidhu Moosewala's family members called on Union Home Minister Amit Shah in Chandigarh)
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) चंदीगडमध्ये (Chandigarh) आहेत. यादरम्यान सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी शाह यांची भेट घेतली आणि 10-15 मिनिटे चर्चा केली. मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी शाह यांच्याकडून या हत्येची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
दुसरीकडे, भेटीनंतर मुसेवाला यांचे कुटुंबीय चंदीगड येथील त्यांच्या घरी परतले. त्याचवेळी अमित शहा चंदीगड भाजप (BJP) कार्यालयाकडे रवाना झाले. पंजाब काँग्रेसचे आणखी चार बलाढ्य नेतेही भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी माहिती समोर येत आहे. नुकतेच पंजाबचे माजी पीसीसी प्रमुख सुनील जाखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंजाबमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी शहा पक्षाच्या नेत्यांची मोठी बैठकही घेऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.