पंजाबमध्ये आम आदमी पक्ष टीकेचा धनी; मुसेवाला हत्या चौकशी प्रकरणात मान सरकारची मोठी घोषणा

गायक सिद्धू मुसेवाला जूनमध्ये लग्नबंधनात अडकणार होता. कॅनडा स्थित मुलीशी झाली होती लग्नाची बोलणी
Sidhu Moose Wala
Sidhu Moose WalaTwitter
Published on
Updated on

प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंग उर्फ ​​सिद्धू मूसवालावर आज दुपारी 12 वाजता त्याच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सिद्धूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला. गायक सिद्धू मुसेवाला जूनमध्ये लग्नबंधनात अडकणार होता. संगरूरच्या भवानीगड उपविभागातील सरघेरी गावातील एका मुलीशी त्याची लग्नाची बोलणी झाली होती, जी सध्या कॅनडात स्थायिक आहे. (Sidhu Moose Wala Murder)

दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती आणि मुलगी लग्नासाठी कॅनडाहून संगरूरला पोहोचली होती. या वर्षी जानेवारीमध्ये सिद्धू मुसेवालाच्या आईने मीडियाने विचारले असता सांगितले होते, 'बस थोडा वेळ द्या नंतर तो अविवाहित राहणार नाही. आम्ही त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी (विधानसभा) निवडणुकीनंतर त्याचे लग्न होणार आहे, असे सांगितले होते. मात्र मानसा येथे सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि सगळच माती मोल झाली.

Sidhu Moose Wala
सिद्धूने केली होती वाढदिवसाची जोरदार तयारी, सलीम मर्चंटने सांगितला भावनिक किस्सा

सिद्धू मुसेवालाला 7 गोळ्या लागल्या होत्या

फरीदकोट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पटियाला येथील दोन फॉरेन्सिक तज्ज्ञांसह मानसा सिव्हिल हॉस्पिटलच्या 3 डॉक्टरांनी सिद्धू मुसेवालाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धूला 7 गोळ्या लागल्या होत्या. शरीरातून सहा गोळ्या गेल्या होत्या. गोळी लागल्याने गायकाचा उजवा कोपर तुटला होता. त्याच्या छातीत आणि पोटात सर्वाधिक गोळ्या लागल्या आणि त्याच्या उजव्या पायात 2 गोळ्या लागल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Sidhu Moose Wala
ISI आणि खलिस्तानी संघटनांची परदेशात बसून पंजाबी गुंडांना मदत, भारताविरुद्ध कट

पंजाबच्या भगवंत मान सरकारने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मूसेवालाच्या कव्हरमधून दोन सुरक्षा कर्मचारी काढून घेण्याच्या निर्णयावर सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने 28 मे रोजी मूसेवालाची सुरक्षा कमी केली होती. दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com