Video: 'शबाना आझमी अन् नसीरुद्दीन शाह तुकडे-तुकडे गॅंगचा भाग': MP च्या मंत्र्यांचं वक्तव्य

Shabana Azmi: शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे लोक तुकडे-तुकडे गॅंगच्या स्लीपर सेलचे एजंट आहेत.
Home Minister Narottam Mishra
Home Minister Narottam MishraDainik Gomantak

Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra: मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शनिवारी शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर यांच्यावर 'तुकडे-तुकडे गँगचा भाग असल्याचा आरोप केला. भाजप समर्थकांनी त्यांच्या टीकाकारांना लक्ष्य करण्यासाठी 'तुकडे-तुकडे गँग' असा अपमानास्पद शब्द वापरला आहे. मंत्रिमहोदयांनी अख्तर आणि आझमी यांच्यावर आरोप केला की, 'ते फक्त भाजपशासित राज्यांमध्येच आवाज उठवतात.'

दरम्यान, नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) पुढे म्हणाले की, 'शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे लोक तुकडे-तुकडे गॅंगच्या स्लीपर सेलचे एजंट आहेत, जे केवळ भाजपशासित (BJP) राज्यांमध्ये घडलेल्या घटनांवर गदारोळ माजवतात. तर राजस्थान (Rajasthan) आणि झारखंडसारख्या काँग्रेस (Congress) शासित राज्यांमध्ये गप्प बसतात. आता अशा लोकांचा पर्दाफाश झाला आहे.'

दुसरीकडे, शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी बिल्किस बानो प्रकरणावर आवाज उठवला होता. या प्रकरणातील दोषींना 15 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर गुजरात सरकारने सोडले आहे.

Home Minister Narottam Mishra
'मुघलांनी या देशासाठी योगदान दिले': नसीरुद्दीन शाह

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या होत्या, "माझ्याकडे बिल्कीस बानोसाठी शब्द नाहीत, गुजरात सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करते. माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत."

तसेच, भाजप नेते आणि मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी यांच्यावर काँग्रेसशासित राज्यांतील घटनांबाबत आवाज उठवत नसल्याचा आरोप केला. मिश्रा पुढे असेही म्हणाले, "राजस्थानमधील कन्हैया लालच्या हत्येबाबत किंवा झारखंडमध्ये जिवंत जाळलेल्या महिलेबाबत शबाना आझमी काहीही बोलल्या नाहीत."

Home Minister Narottam Mishra
जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह यांच्या सपोर्टमध्ये माजी नौसेना प्रमुख लक्ष्मीनारायण

शिवाय, बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींना सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शबाना आझमी अलीकडेच महिला आणि विद्यार्थ्यांच्या गटात सामील झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com