जेव्हा बलात्कार सहन होत नाही, तेव्हा... काँग्रेस नेत्याचं बेताल वक्तव्य

कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.आर रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारासंबंधी धक्कादायक टिप्पणी केली.
K. R. Ramesh Kumar

K. R. Ramesh Kumar

Dainik Gomantak 

Published on
Updated on

कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.आर रमेश (K. R. Ramesh Kumar) कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारासंबंधी धक्कादायक टिप्पणी केली, "जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि त्याचा आनंद घ्या." असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या बेताल वक्तव्याविरुध्द प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच, काँग्रेस (Congress) आमदाराने महिलांविरोधात अशी टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

<div class="paragraphs"><p>K. R. Ramesh Kumar</p></div>
कर्नाटक हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी !

रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली

2019 मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कुमार यांनी स्वतःची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) आणि इतर वरिष्ठ नेत्यांमधील वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचे नाव समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्याची टिप्पणी आली आहे. ज्यात त्यांनी पक्षाकडून 50 कोटी रुपयांची लाच कशी घेतली याचा उल्लेखही केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांनी जारी केलेल्या ऑडिओटेपमध्ये त्यांच्यावर केलेले आरोप चर्चेचा केंद्रबिंदू बनले तेव्हा कुमार म्हणाले होते की, माझी परिस्थिती बलात्कार पीडितेसारखी आहे.

बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद करुन कोर्टात उलटतपासणी घेतली असता ते म्हणाले की, "मला बलात्कार पीडितेसारखे वाटते." नंतर जेव्हा महिला आमदारांनी असंवेदनशील विधानाचा निषेध केला तेव्हा कुमार यांनी माफी मागितली.

<div class="paragraphs"><p>K. R. Ramesh Kumar</p></div>
चंदीगड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ओमिक्रॉनची नवीन तीन रुग्ण, देशात 36 संक्रमित

विधानसभेत 'असंसदीय' भाषा वापरल्याबद्दल ताशेरे ओढले

सप्टेंबर 2020 मध्ये, रमेश कुमार यांनी एका कन्नड असंसदीय शब्दाचा वापरला होता. तेव्हा सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी त्यांची विधानसभेतून तात्काळ हकालपट्टी केली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांच्या कोरोनावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान अधीर होत ते म्हणाले, "जे (पीपीई किट) खरेदी करण्यात आले त्या किमतीतील तफावतीचे आम्ही समर्थन करत आहोत. ते पुढे असेही म्हणाले की, मी प्रथम 300 रुपयांना पीपीई कीट विकत घेतले होते त्यानंतर खर्च वाढला आणि विविध समित्या स्थापन कराव्या लागल्या. या समित्यांमध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचाही समावेश होता. मात्र महान लोकांनी xxxxx काम केले म्हणून ते महान काम आहे का?"

काँग्रेस आमदाराची बलात्कारासंबंधी टिप्पणी

विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदारांनी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ मागितला असता काँग्रेस नेत्याची ही धक्कादायक टिप्पणी आली. या मागणीला उत्तर देताना विश्वेश्वरा हेगडे कागेरी यांनी प्रत्येकाला वेळ दिल्यास अधिवेशन कसे चालवायचे, असा सवालही उपस्थित केला.

पुढे त्यांनी सदस्यांना स्वतःहून निर्णय घ्या असे सांगत माजी सभापती के.आर रमेश कुमार यांच्याकडे पाहत म्हणाले, "मला वाटते की, आपण परिस्थितीचा आनंद घेऊ या, मी हे नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि पद्धतशीरपणे पुढेही जाऊ शकत नाही." सभापतींना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते उभे राहत म्हणाले, एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि आनंद घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com