सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

Amrapali Express latest news: मोबाईल नंबरवरुन पोलिसांनी दीपक चव्हाण आणि अंकीत चव्हाण या दोन भावांना अटक करण्यात आली.
Amrapali Express latest news
Amrapali Express bomb rumorDainik Gomantak
Published on
Updated on

कानपूर: ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्यामुळे अम्रपाली एक्समध्ये धावपळ झाली. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे पोलिस, बॉम्ब शोधक पथक आणि प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. संपूर्ण ट्रेनची झाडाझडती घेतल्यानंतर त्यात काहीच नसल्याचे आढळून आले. दरम्यान, सीटवरुन झालेल्या वादातून अफवा पसरविण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर येथे अम्रपाली एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथ, रेल्वे पोलिस, शहर पोलिस आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अम्रपाली एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ट्रेनमध्ये बॉम्ब नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी बॉम्बची माहिती मिळालेल्या नंबरचा तपास सुरु केला.

Amrapali Express latest news
October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

मोबाईल नंबरवरुन पोलिसांनी दीपक चव्हाण आणि अंकीत चव्हाण या दोन भावांना अटक करण्यात आली. दोघे घातमपूर येथील राह गावचे रहिवासी आहेत. दोघांची चौकशी केली असता सीटवरुन झालेल्या वादातून त्यांनी ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवली, असे त्यांनी कबुल केले. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Amrapali Express latest news
Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

दोघांनी पोलिसांना फोन अम्रपाली एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती, असे दोघांनी कबुल केल्याचे पोलिसांनी टाईम्सला माहिती दिली आहे. रेल्वेत केलेल्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

सीटवरुन झालेल्या वादानंतर त्यांनी हा खोडसाळपणा केल्याचे देखील मान्य केले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत दोघांनी माफी देखील मागितली आहे. दरम्यान, दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com