Viral Video: 'बादल बरसा बिजुली' या गाण्यावर शाळकरी मुलाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

School Kid Dance Video: आनंद कार्की आणि मांडवी त्रिपाठी यांच्या 'बादल बरसा बिजुली' या नेपाळी गाण्याने भारतात ऑनलाइन ट्रेंड वाढवला आहे.
School Kid Dance Video
School Kid Dance VideoDainik Gomantak
Published on
Updated on

School Kid Dance Video: आनंद कार्की आणि मांडवी त्रिपाठी यांच्या 'बादल बरसा बिजुली' या नेपाळी गाण्याने भारतात ऑनलाइन ट्रेंड वाढवला आहे.

केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर रील बनवत आहेत. यातच आता, या गाण्यावर एक मुलगा व्हायरल होत आहे, जो त्याच्याच शाळेत शिक्षक दिनानिमित्त डान्स करताना दिसला होता.

व्हिडिओमध्ये तुम्ही एक गोंडस मुलगा पाहू शकता, ज्याने या ट्रेंडी गाण्यावर आपल्या डान्स मूव्ह्सने सर्वांचीच मने जिंकली. या गाण्यावर तो डान्स करताना दिसला.

शाळकरी मुलाने जबरदस्त डान्स केला

@duskndawn.xo ने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये, शाळेतील

(School) एका कार्यक्रमात एक शाळकरी मुलगा 'बादल बरसा बिजुली' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

सर्वात खास गोष्ट म्हणजे जेव्हा तो स्टेजवर आनंदाने नाचायला लागतो तेव्हा स्टेजसमोरील मुलेही नाचू लागतात. हे विलोभनीय दृश्य पाहून तुम्हीही सुखावून जाल. संगीत आणि नृत्याचा मिलाफ पाहून लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या.

School Kid Dance Video
Viral Video: बाल निवारागृहात मुलीला चपलेने मारहाण, अधिकारी महिलेच्या मनमानीचा चिमुकल्यांसह कर्मचाऱ्यांनाही फटका

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ इतका मोहक होता की, तो काही तासांतच इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी लिहिले की, गोंडस मुलाचा डान्स (Dance) त्यांना खूप आवडला. ही पोस्ट 6 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती.

पोस्ट केल्यापासून ती 24 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. शेअरवर 328K पेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक कमेंट्स आहेत. या व्हिडिओवर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

एका व्यक्तीने लिहिले की, "तो हा ट्रेंड जिंकला." तर दुसरा म्हणाला, "यामुळे मी इंटरनेटसाठी पैसे देतो."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com