Farmers Protest: केंद्राविरोधात एल्गार

महापंचायतीने केंद्राच्या धोरणांविरोधात 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ची (Bharat Band) हाक दिली आहे.
Farmers Protest: Rakesh Tikait
Farmers Protest: Rakesh TikaitDainik Gomantak
Published on
Updated on

मुझफ्फरनगर: महापंचायतीसाठी जमलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या (Farmers Protest) साक्षीने संयुक्त किसान मोर्चाने केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधात एल्गार पुकारला. ‘शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द केलेच पाहिजेत’, या मागणीवर ठाम रहात, महापंचायतीने केंद्राच्या धोरणांविरोधात 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ची (Bharat Band) हाक दिली आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत त्यांना पराभूत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Farmers Protest: Rakesh Tikait
Ganesh Chaturthi: बेळगावात यंदा पाच दिवस गणपती

मुझफ्फरनगरमधील गव्हर्नमेंट इंटर कॉलेजच्या मैदानावर ही विराट महापंचायत झाली. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील शेतकरी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत, प्रवक्ते राकेश टिकैत, संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक दर्शनपाल सिंग, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, मेधा पाटकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पोलिस यंत्रणेकडून महापंचायतीला दोन लाखांहून अधिक शेतकरी आले होते, असा अंदाज वर्तविला जात आहे. मोदी सरकार हेच या महापंचायतीचे लक्ष्य होते. त्यामुळे सर्वच नेत्यांनी या सरकारच्या धोरणांवर टीका केली.

Farmers Protest: Rakesh Tikait
कोरोनामुळे भारतात अडकलेले पाकिस्तानी नागरिक अखेर मायदेशी परतले

"कृषी कायदे हे केवळ काळे कायदे नाही तर, ही सरकारची काळी नजर आहे. त्यांनी नोटबंदी केली होती, आता त्यांच्या विरोधात तुम्ही व्होटबंदी’ करा. अयोध्याच्या नावाखाली देशात धार्मिक अंधत्व पसरविले जात आहे."

- मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या

महापंचायतीचा निर्णय

शेतीमालाला भाव नाही, तोपर्यंत निवडणुकीत मतही नाही देशभरात प्रत्येक महिन्याला शेतकरी महापंचायत घेणार.

-संतोष शाळिग्राम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com