Prime Minister Narendra Modi and Amit Shah
Prime Minister Narendra Modi and Amit ShahDainik Gomantak

Assembly Election Result 2023: "सनातन धर्माला शिव्या...", भारतीय दिग्गजाने मोदी-शहांवर उधळली स्तुतीसुमने

Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत.

Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. तेलंगणा वगळता भाजपला यश आणि इतर सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची निराशा होताना दिसत आहे. ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. अशा स्थितीत या निकालांवर लोकांच्या प्रतिक्रिया चहूबाजूंनी उमटत आहेत. यातच आता, आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादनेही असे विधान केले आहे, ज्यामुळे विरोधी पक्षांना मिर्ची लागले.

सनातनवरील हल्ल्याचा परिणाम- व्यंकटेश

व्यंकटेश प्रसादने लिहिले की, सनातन धर्माबद्दल बोलल्याचा हा परिणाम आहे. भाजपच्या प्रचंड विजयाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अद्भूत नेतृत्वाचा आणि तळागाळातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हा विजय आहे."

Prime Minister Narendra Modi and Amit Shah
Rajasthan Assembly Election Result 2023: यादव, हिंदुत्व आणि नवा चेहरा; राजस्थानमध्ये भाजप योगींना करु शकतो 'मुख्यमंत्री'?

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात असून तो संपवला पाहिजे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने म्हटले होते की, सनातन धर्मावरील हल्ला हा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रणनीतीचा भाग होता. पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी द्रमुक हा भाजपविरोधी आघाडीचा भाग असल्याने या वक्तव्यावर इंडिया ब्लॉकवर टीका केली होती. जेपी नड्डा यांनी ट्विट करत म्हटले होते की, “काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि सांगावे की संविधानाने कोणत्याही धर्माविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा अधिकार दिला आहे का? "इंडिया अलायन्सच्या सदस्यांना घटनात्मक तरतुदी माहित नाहीत का?"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com