Video: BJP आमदाराचा निष्काळजीपणा! मोबाईल गेमवर महोदयांनी मांडला तीन पत्तीचा डाव

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील महोबा मतदारसंघातील भाजप आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
BJP MLA
BJP MLADainik Gomantak

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील महोबा मतदारसंघातील भाजप आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार महोदय विधानसभेत बसून व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहेत. समाजवादी पार्टी मीडियाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यानंतर विरोधकांनी योगी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, “महोबाचे भाजप आमदार विधानसभेत मोबाईलवर तीन पत्तीचा गेम खेळत आहेत.'' यापूर्वी, कर्नाटकातील भाजपचे आमदार मोबाईलवर पॉर्न पाहताना आढळून आले होते.

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) मीडिया विंगने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “भाजप (BJP) आमदारांना सार्वजनिक समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. ते फक्त भ्रष्टाचार, बलात्कार आणि फालतू गेम यातच गुंतले आहेत. हे भाजपचे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी आहेत का?''

BJP MLA
Uttar Pradesh: मुकुल गोयल यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवले

दुसरीकडे, ही पोस्ट 24 सप्टेंबर रोजी @MediaCellSP च्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तसेच, एका यूजरने लिहिले की, "आता मी दीड लाखांचा फोन घेतला आहे, तर हीच आशा आहे." दुसऱ्या यूजरने लिहिले की, "कोणी आमदार महोदयांना निलंबित करेल का? सरकारी नोकरदाराची आत्तापर्यंत चौकशी होऊन कारवाई झाली असती.” तिसऱ्या युजरने लिहिले, “लज्जास्पद.”

BJP MLA
Uttar Pradesh: योगी 2.0 सरकारमध्ये 3 उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

त्याचबरोबर, आणखी एका युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “भाजप आमदार घरात बसून मोबाईलवर गेम खेळत आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी अशी कृत्ये होत असतील, तर महागाई (Inflation), बेरोजगारी, उपासमारीच्या समस्या कोण ऐकणार?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com