Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

Sam Pitroda Controversial Statement: सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
sam pitroda
sam pitrodaDainik Gomantak

Sam Pitroda Controversial Statement: सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेस नेते सॅम पित्रोदाही यामध्ये मागे नाहीत. वादग्रस्त वक्तव्य करुन ते अनेकदा सत्ताधारी पक्षाला काँग्रेसवर टीकास्त्र डागण्यासाठी आयतं कोलित देतात. दरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन राळ उडवून दिली आहे. वास्तविक, भारताच्या विविधतेबद्दल बोलताना पित्रोदा म्हणाले की, ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात तर दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. तर पश्चिमेकडील लोक अरबी दिसतात आणि उत्तर भारतीय गोरे दिसतात.’’

'द स्टेट्समन' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘’आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकत्र ठेवू शकतो, जिथे पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. परंतु याने काही फरक पडत नाही, आम्ही सर्व बंधू-भगिणी आहोत.’’

sam pitroda
Rahul Gandhi: ''जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांना...''; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

पित्रोदा पुढे असेही म्हणाले की, ‘’भारतातील विविध प्रदेशातील लोकांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ, धर्म, भाषा भिन्न आहेत, परंतु भारतातील लोक एकमेकांचा आदर करतात. देशातील जनता 75 वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे, काही वाद सोडले तर लोक एकत्र राहू शकतात.’’

दरम्यान, भाजप नेत्यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पित्रोदा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘’सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि मी भारतीयासारखा दिसतो. आपला देशाने विविधतेने नटलेला आहे, आपण भिन्न दिसू असू परंतु आपण सर्व एक आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या.’’

sam pitroda
Rahul Gandhi: ''पीएम मोदींना संविधान रद्द करायचंय...'' भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

वारसा कराच्या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला होता

ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी नुकतेच वारसा कराबाबतही वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘’अमेरिकेत वारसा कर आहे, ज्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना फक्त 45 टक्के संपत्ती मिळते, बाकीची मालमत्ता सरकार जमा होते.’’

दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभेत ‘’वारसा कर’ हा मुद्दा बनवत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला तुमची मालमत्ता हिरावून घ्यायची आहे, असे ते म्हणाले. पित्रोदा यांच्या वक्तव्यावर एवढा गदारोळ झाला की काँग्रेस पक्षाला बचावासाठी राजकीय अखाड्यात उतरावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com