'या' राज्यात प्रवास करत असाल तर RT-PCR अनिवार्य नाही

तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रवासासंबंधीच्या (Air Passengers) नियमामध्ये शिथिलता आणण्यात येत आहे.
Air passengers
Air passengersDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाची (Covid 19) तिसरी लाट येणार आसल्याची तज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र कोरोना महामारीचा प्रकोप कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा अनलॉक प्रक्रिया (Unlock) चालू करण्यात आली आहे. देशात साधारणत:हा दैनंदिन कोरोना रुग्ण तीस हजारच्या आसपास आढळूण येत आहेत. मात्र या कोरोना काळात पटरीवरुन घसरलेल्या अर्थव्यस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक एक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रवासासंबंधीच्या (Air Passengers) नियमामध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. बऱ्याच राज्यांनी राज्यामध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आवश्यक असणार नाही. यासंबंधीची अनिवार्यता रद्द केली आहे. पाहूया देशातील कोणकोणत्या राज्यांनी यासंबंधी निर्णय घेतला आहे.

Air passengers
Corona Virus: रुग्णांच्या आकडेवारीत भारत जगात चौथ्या स्थानावर

दरम्यान, दूसऱ्या राज्यामध्ये हवाई सेवासंबंधी नियम अजूनही सक्तीचे आहेत. मात्र यामध्येही शिथिलता आणण्यात येत आहे. सध्या सात राज्यांनी प्रवाशांना पूर्णरित्या खुले करण्यात आले आहे. हवाई प्रवास करत असलेल्या प्रवाशांना आरटी पीसीआर (RT-PCR Test) चाचणी यापुढे अनिवार्य असणार नाही. दुसरीकडे 11 राज्यांनी प्रवाशांना प्रवासाठी मान्यता दिली आहे मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य केले आहे. मात्र या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या राज्यांनी आरटी-पीसीआर चाचणीची अनिवार्यता केली शिथिल

सध्या देशातील मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंचाब, चंदीगढ, हरियाणा, तेलंगणा या राज्यांमध्ये प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असणार नाही. मात्र प्रवासादरम्यान राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर ही शिथिलता रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Air passengers
Corona Wave : देशात ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तज्ञांनी वर्तविली शक्यता

गुजरात आणि तामिळनाडूसाठी काय आहेत नियम

गुजरात राज्यामध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी आवश्यक असणार नाही. मात्र प्रवाशांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास अहमदाबाद विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. मात्र दुसरीकडे तामिळनाडूमध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची चाचणीची आवश्यकता असणार नाही. तसेच दूसऱ्या राज्यातून तामिळनाडू राज्यामधील कोयम्बतूर शहरामध्ये प्रवास करत असल्यास 72 तास आगोदर आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com