स्टार खेळाडूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक, निवृत्ती घेतली मागे; 'या' देशाकडून खेळणार

Ross Taylor comes out of retirement: न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन परत आला आहे.
Ross Taylor comes out of retirement
Ross Taylor comes out of retirementDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन परत आला आहे. २०२२ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर निवृत्ती घेतलेल्या टेलरने आता वयाच्या ४१ व्या वर्षी पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानावर उतरायचे ठरवले आहे. मात्र यावेळी तो न्यूझीलंडच्या नाही तर सामोआ संघाच्या जर्सीत दिसणार आहे.

टेलरने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "मला सांगताना खूप आनंद होत आहे की मी निळी जर्सी घालून क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करेन. माझ्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे."

Ross Taylor comes out of retirement
Goa Taxi Meter: ॲपबेस मीटर बिघडले! टॅक्सीधारकांची वाहतूक संचालनालयात धाव; दंडाच्या भीतीने टॅक्सीचालक ‘पॅनिक’

सामोआ संघाने पुढील वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक टी२० विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यात रॉस टेलरला स्थान मिळाले आहे.

संघात कर्णधार कालेब जसमत, डॅरियस व्हिसर, शॉन सोलिया, डॅनियल बर्गेस, डग्लस फिनाऊ, सॅम फ्रेंच, कर्टिस हायनाम-नायबर्ग, बेन मैलाटा, नोआह मीड, सोलोमन नॅश, सॅमसन सोला, फेरेती सुलुलोटो, सौमानी तियाई, आणि इली तुगागा यांचा समावेश आहे.

टेलरने न्यूझीलंडसाठी खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १८१९९ धावा केल्या असून ४० शतकही झळकावले आहेत. निवृत्तीनंतर त्याला दुसऱ्या देशासाठी खेळण्यासाठी आयसीसीच्या नियमांनुसार तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागतो, जो टेलरने यापूर्वी पूर्ण केला आहे.

Ross Taylor comes out of retirement
Goa Rain: ..थांबला बुवा एकदाचा! पुढचे 4 दिवस पावसाची उघडीप; जोर मंदावणार

क्रिकेट चाहत्यांसाठी हा निर्णय निश्चितच मोठा सरप्राइज ठरला आहे, आणि रॉस टेलरच्या सामोआ संघात सामील होण्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन अध्याय सुरू करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com