Rohit Sharma: मुंबईच्या राजाला झालंय तरी काय? 'हॉस्पिटल'मधल्या व्हिडिओमुळं चाहते टेन्शनमध्ये Watch Video

Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai: एकदिवसीय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी तो मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai
Rohit Sharma spotted in Kokilaben hospital MumbaiDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai

मुंबईचा राजा आणि एकदिवसीय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी तो मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यात तो मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या बाहेर दिसून आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आपल्या गाडीतून खाली उतरून रुग्णालयाच्या आत जाताना स्पष्ट दिसत आहे. पुढे काय घडलं याचा तपशील मात्र त्या क्लिपमध्ये नाही.

Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai
Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

यामुळे चाहत्यांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, रोहित नक्की कोणत्या कारणाने रुग्णालयात गेला? तो स्वतःच्या प्रकृती तपासणीसाठी गेला होता का? की त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी माहिती घेण्यासाठी तिथे दाखल झाला होता? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

रोहित शर्मा भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज असून "हिटमॅन" म्हणून तो ओळखला जातो. आगामी क्रिकेट मालिकांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रकृतीची चिंता चाहत्यांना अधिकच सतावत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत, "हिटमॅन बरा असो" असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय.

Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

रोहितच्या रुग्णालयातील भेटीमागचं खरं कारण काय? हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालं नाहीय. पण एक गोष्ट नक्की की, चाहत्यांच्या मनात रोहितच्या प्रकृतीविषयी चिंता आणि काळजी सध्या चांगलीच वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com