Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Ajit Agarkar On Captaincy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली.
Ajit Agarkar On Captaincy
Ajit Agarkar On CaptaincyDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून, यावेळी मोठा बदल करण्यात आला आहे. अनुभवी फलंदाज आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त करण्यात आलं असून, युवा खेळाडू शुभमन गिलला ही जबाबदारी देण्यात आली आहे. बोर्डाच्या या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवणे कठीण आहे. सध्या आमचं मुख्य लक्ष टी-२० विश्वचषकावर केंद्रित आहे. एकदिवसीय फॉरमॅट तुलनेने कमी खेळला जातो, त्यामुळे आम्हाला युवा खेळाडूंना संधी देण्याची गरज होती. गिलमध्ये आम्हाला पुढील पिढीचा कर्णधार दिसतो आणि त्याला आता जबाबदारीची सवय व्हावी, म्हणून हा निर्णय घेतला आहे.”

Ajit Agarkar On Captaincy
Arvind Kejriwal Goa: 'जनतेचा भाजप, काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे'! अरविंद केजरीवालनी केला दावा; ‘आप’च्या बैठकांसाठी गोव्यात दाखल

अजित आगरकर यांनी पुढे सांगितले की, रोहित शर्मा संघाचा भाग आहे, मात्र आता तो खेळाडू म्हणून खेळणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संघाला नक्कीच होईल. या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तरुणांना संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचं कौतुक केलं आहे, तर काहींनी अनुभवी रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संघातील स्थानाबाबतही आगरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघात सामील होण्यासाठी आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. आम्ही निवडलेली सर्व नावे सीओईकडे पाठवली आहेत आणि त्यांच्या फिटनेसची पुष्टी झाली आहे.”

Ajit Agarkar On Captaincy
Goa Crime: जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, साडेचार वर्षीय मुलींनी दिली साक्ष; 39 वर्षीय तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मालिकेत गिलसारख्या नव्या कर्णधाराकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. गिलला आता नेतृत्वाची कसोटी द्यावी लागणार आहे आणि त्याचं प्रदर्शन पुढील काळातील भारतीय कर्णधारपदाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com