Rohit Sharma Dance Video: 'मेरे यार की शादी है' गाण्यावर रोहित शर्माचा डान्स, वेडिंग फोटोशूटदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Dance Viral Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि “हिटमॅन” म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा मैदानावर त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
Rohit Sharma Dance Video
Rohit Sharma Dance VideoDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि 'मुंबईचा राजा' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा मैदानावर त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र मैदानाबाहेर तो एक वेगळाच, आनंदी आणि मजेशीर व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे, हे चाहत्यांना वारंवार दिसून येतं. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याचा असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यात रोहितने नवविवाहित जोडप्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

हा व्हिडिओ रोहित शर्माच्या वर्कआउट सेशनदरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहताना रोहितने लग्नाचे फोटोशूट करत असलेले जोडपे पाहिले आणि त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. लगेचच त्याने आपल्या स्पीकरवरून क्लासिक बॉलीवूड गाणं “आज मेरे यार की शादी है” वाजवलं आणि खिडकीत उभं राहून आनंदात नाचायला सुरुवात केली.

हा क्षण पाहून समोरचं नवविवाहित जोडपं अक्षरशः थक्क झालं. लग्नाच्या फोटोशूटदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्वतः त्यांच्या लग्नाचं गाणं लावून नाचतोय, हे त्यांच्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. जोडप्यानेही आनंदाने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हा एक क्षण आहे!” ज्याची आठवण ते आयुष्यभर विसरणार नाहीत.

Rohit Sharma Dance Video
Goa Governance: 'गोमंतकीयांच्या समस्या आता AI सोडवणार'! मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; 90% तक्रारींचा 2 दिवसांत निवारणाचा दावा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, चाहते रोहितच्या या मस्त मूडवर फिदा झाले आहेत. अनेकांनी कमेंट करत लिहिलं आहे, “हा आहे खरा हिटमॅन!” काहींनी तर म्हटलं, “मैदानावर फटके, आणि मैदानाबाहेर फुलटू मजा , रोहित भाई जबरदस्त!”

Rohit Sharma Dance Video
Goa ZP Election: 'भाजप' तिकिटासाठी भाऊगर्दी, पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली; 12 पेक्षा अधिक उमेदवारांचे गुडघ्‍याला बाशिंग

दरम्यान, रोहित शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. ही मालिका ३० नोव्हेंबरपासून रांची येथे सुरू होणार असून, पुढील सामने ३ डिसेंबर रोजी रायपूरमध्ये आणि ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळले जातील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलीकडील मालिकेत रोहितने १०१ च्या सरासरीने २०२ धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या विजयासाठी तो पुन्हा एकदा मुख्य शस्त्र ठरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com