MLA Viral Audio: "मी तुला चप्पलने मारेन" फोनवर ओळखलं नाही म्हणून आमदाराची दादागिरी, ऑडिओ क्लिप व्हायरल

RJD MLA Bhai Virendra Viral Audio: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) मानेर येथील आमदार भाई वीरेंद्र आणि एका पंचायत सचिवामधील फोनवरून झालेला कथित वादाचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
RJD MLA Bhai Virendra Viral Audio
RJD MLA Bhai Virendra Viral AudioDainik Gomantak
Published on
Updated on

Maner MLA Bhai Virendra allegedly threatens panchayat secretary in viral audio

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘पंचायत’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, सचिव आणि स्थानिक राजकारण्यांमधील संघर्ष या मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या मालिकेची चर्चा अजूनही सुरू असतानाच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी या मालिकेतील कथानकाशी मिळतीजुळती वाटते.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) मानेर येथील आमदार भाई वीरेंद्र आणि एका पंचायत सचिवामधील फोनवरून झालेला कथित वादाचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये आमदार, सचिवाला "जूते से मारूंगा" अशी धमकी देताना ऐकू येत आहेत.

RJD MLA Bhai Virendra Viral Audio
Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, भाई वीरेंद्र यांनी त्यांच्या मतदारसंघातील रिंकी देवी या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्राबाबत विचारणा करण्यासाठी स्थानिक पंचायत सचिवाला फोन केला होता. मात्र सचिवाने त्यांना ओळखले नाही. यामुळे आमदार चांगलेच संतापले आणि म्हणाले, "तुम्हाला भाई वीरेंद्र माहिती नाहीत? संपूर्ण देश मला ओळखतो! मी तुला बुटाने मारेन. हिम्मत कशी झाली अशी भाषा वापरण्याची?"

त्यांच्या या वक्तव्याचा कथित ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ही क्लिप India Today नेही प्रसिद्ध केली असून तिची विश्वासार्हता तपासली जात आहे.

RJD MLA Bhai Virendra Viral Audio
Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

संपूर्ण संभाषणात सचिवाने अत्यंत शांत आणि संयमी भाषेत संवाद साधला. त्याने उत्तर दिलं की, “जर तुम्ही आदराने बोललात तर मी देखील तसेच करेन. जर तुम्ही वाकडे बोललात, तर मी देखील वाकडे बोलेन. मी घाबरणार नाही. कृपया कामावर बोला. तुमची विनंती आधीच प्रक्रियेत आहे. धमकी देऊ नका.”

या उत्तराने अधिकाऱ्याच्या व्यावसायिकतेचे कौतुक होत असून, प्रशासनात असलेल्या दबावाखालीही तो न डगमगता काम करतो आहे, असे लोक म्हणत आहेत.

या प्रकरणावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी आमदार भाई वीरेंद्र यांच्यावर टिका केलीय. मात्र, आररजेडी पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com