पोलीस कारवाई करत नसल्याने संतप्त महिलेने कुऱ्हाड घेऊन गाठले पोलीस ठाणे; आणि...

महिलेने केलेल्या या गोंधळामुळे पोलीस विभागात खळबळ
Madhya Pradesh Police
Madhya Pradesh Police Dainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशातील रीवा शहरातील महिला पोलिस स्टेशन आणि सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात रविवारी रात्री एक महिला हातात कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचल्याने खळबळ उडाली. प्रथम महिलेने पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खडे बोल सुनावले आणि त्यानंतर ती सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गेली. येथेही महिलेने गोंधळ घातला आणि पोलिसांना शिवीगाळ केली. (rewa police was not taking action on the complaint angry woman reached the police station with an ax)

तासनतास चाललेल्या या गदारोळात महिला पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून पोलिसांना शिवीगाळ करत राहिली. मात्र, पोलिसांनी महिलेला शांत केल्यानंतर तिची कैफियत ऐकून घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले. महिलेने केलेल्या या गोंधळामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात गोंधळ घालणारी कृष्णा गौतम ही महिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यांतर्गत दीनदयाळ कॉलनी येथील रहिवासी असून, तिच्यासोबत परिसरातील लोकांनी मारहाण केली होती.

Madhya Pradesh Police
8.75 कोटीचा खेळाडू संघाला झाला जड, आता पुढे खेळणेही कठीण

महिलेचा आरोप आहे की, तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे हल्लेखोरांचा उत्साह वाढला आहे. पोलिसांनी ऐकले नाही तेव्हा स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वतः कुऱ्हाड हाती घेतली आणि पोलिस ठाणे गाठले. मात्र, महिलेच्या या गदारोळातून अनेक अर्थ काढले जात असून पोलिसांच्या ढिसाळ कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले

पोलीस ठाण्यात तासनतास चाललेल्या या गोंधळात महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. महिलेने पोलिसांसमोर स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही गणवेश फक्त पैसे घेण्यासाठी घालता, कारवाई करण्यासाठी नाही. महिलेच्या गोंधळाची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि महिलेला घेऊन वस्ती गाठली. उपनिरीक्षक राणू वर्मा आणि सुभेदार अंजली गुप्ता महिला कॉन्स्टेबलसह तक्रारदाराला घेऊन तिच्या घराजवळ पोहोचल्या आणि महिलेचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर महिलेला योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आले, त्यानंतर महिलेचा राग शांत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com