'लोकतंत्र के सिपाही' विजयाचे प्रमाणपत्र घेवूनच परतणार! अखिलेश यादवांना विश्वास

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज निकाल जाहीर होत आहेत.
UP Assembly Election Results 2022
UP Assembly Election Results 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल (UP Assembly Election Results 2022) आज निकाल जाहीर होत आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक ट्विट केले. तो म्हणाला की, 'आत्म्यांची परीक्षा अजून बाकी, 'निर्णय' घेण्याची वेळ आलेली आहे. मतमोजणी केंद्रांवरती रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक मी आभारी आहे! 'लोकशाहीचे शिपाई' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परतले आहेत! (results of Uttar Pradesh Assembly elections are being declared today)

UP Assembly Election Results 2022
पंजाबमध्ये काँग्रेस 18 जागांवर तर आप 10 जागांवर पुढे

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत असलेली मतमोजणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश हे भाजप आणि मोदी सरकारसाठी (Modi Government) खूप महत्वाचे मानले जाते कारण राज्याने लोकसभेत जास्तीत जास्त 80 खासदार पाठवले आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीवरती परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांतील सुमारे 1200 सभागृहांमध्ये मतमोजणीसाठी 50,000 हून अधिक अधिकारी तैनात करण्यात आले असून कडेकोट बंदोबस्तात करण्यात आला असून सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.

750 पेक्षा जास्त मोजणी हॉल बांधले आहेत

कोविड-19 (Covid-19) विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते आहे. उत्तर प्रदेशमध्ये 750 हून अधिक मतमोजणी हॉल तयार करण्यात आले असून, तर जिथे विधानसभेच्या सर्वाधिक 403 जागा आहेत. यानंतर पंजाबमध्ये 200 हून अधिक मतमोजणी हॉल आहेत. या प्रक्रियेवरती देखरेख ठेवण्यासाठी पाच राज्यांमध्ये 650 हून अधिक मतमोजणी निरीक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.

UP Assembly Election Results 2022
UP Assembly Election 2022: EVM छेडछाडीचा प्रश्नच नाही, आयुक्त सुशील चंद्रांचा खुलासा

व्हिडिओ आणि स्थिर कॅमेरे बसवले गेले आहेत

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने लखनऊमध्ये सांगितले की, यूपीच्या सर्व मतमोजणी केंद्रांवरती व्हिडिओ आणि स्थिर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की 10 मार्चसाठी, CAPF च्या एकूण 250 कंपन्या उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हे आणि आयुक्तालयांना प्रदान करण्यात आल्या आहेत. सीएपीएफ कंपनीमध्ये साधारणपणे 70-80 कर्मचारी तैनात असतात. 403 सदस्यांच्या विधानसभेत भाजपला (BJP) बहुमत मिळाल्यास, सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणारी ती गेल्या तीन दशकांतील पहिलीच वेळ असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com