Mamata Banarji attack on rajypal
Mamata Banarji attack on rajypal dainik Gomantak

West Bengal: राज्यपालांना पदावरून हटवा - ममता बॅनर्जी

नबान्न येथे पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते
Published on

पश्चिम बंगालच्या(West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं(Mamata Banerji) आणि राज्यपाल जगदीप धनखर(Jagdip Dhankhar) यांच्यात सतत जे वाद होतात ते आता देशाला नवीन नाहीत . या दोघांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात शाब्दीक वाद होत असतात.पण आता मात्र हा संघर्ष शेंगेला पोहचला आहे कारण आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.याबरोबरच ममता बॅनर्जीनी राज्यपालांवर एक गंभीर आरोप देखील केला आहे.ममता बॅनर्जी म्हणाल्या की , राज्यपाल नेहमी बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते भ्रष्ट आहेत आणि १९९६ च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. त्याच्यांविरोधात आरोपपत्र देखील दाखल केले होते. ते भ्रष्ट असून त्यांना हुकुम करायचा आहे . असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर केलं आहे.

नबान्न येथे पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते. जीटीएच्या तपासणीपूर्वी राज्यपालांच्या भेटीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या लोकांना आपल्याबरोबर घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. ते उत्तर बंगालमध्ये का गेले? आपण कोणाला भेटलात? भाजपाचे आमदार,खासदार अचानक उत्तर बंगालमध्ये का गेले.” अशा अनेक प्रश्नांचा भडीमार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Mamata Banarji attack on rajypal
"लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर दहशतवादाच्या घटना कमी झाल्या"

ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत तीनवेळा केंद्राकडे राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. राज्यपाल नुकतेच बंगालच्या दौर्‍यावरुन कोलकत्याला परतले आहेत. दरम्यान त्यांनी जीएटीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे आणि या आरोपानंतरच ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com