Ravichandran Ashwin Retirement: क्रीडाविश्वात खळबळ! चेन्नईच्या 'या' स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

Ravichandran Ashwin IPL Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि सीएसकेचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Ravichandran Ashwin IPL Retirement
Ravichandran Ashwin IPL RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

या बातमीतील ३ महत्त्वाचे मुद्दे

  1. रविचंद्रन अश्विनने IPL मधून निवृत्ती घेतली असून 2026 मध्ये तो IPL खेळताना दिसणार नाही.

  2. २२१ सामन्यांत १८७ बळी आणि ८३३ धावा अशी त्याची IPL मधील कामगिरी ठळक ठरली.

  3. CSK सह ५ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करताना त्याने २०१० व २०११ च्या विजेतेपद मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि सीएसकेचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली असून, तो आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार नाही. अश्विनने त्याच्या एक्स (Twitter) वर ट्विट करत ही माहिती दिली आणि आपल्या सर्व चाहत्यांचे तसेच संघाचे आभार मानले आहेत.

अश्विनने आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दिसला होता. त्या सीझननंतर त्याला संघातून रिलीज करण्याच्या चर्चांना जोर आला होता. या चर्चांना पूर्णविराम देत अश्विनने स्वतःहून आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.

निवृत्ती जाहीर करताना अश्विनने लिहिले :

“आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे आणि म्हणूनच खास सुरुवातसुद्धा. म्हणतात ना, प्रत्येक शेवट म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. आयपीएल मधला माझा प्रवास मिथाम्बवात आहे, पण विविध लीगमध्ये खेळाचा शोध घेणारा प्रवास आजपासून सुरू होत आहे. या अनेक वर्षांतल्या सुंदर आठवणींसाठी, नातेसंबंधांसाठी सर्व फ्रँचायझींना धन्यवाद द्यायचे आहेत. तसेच आयपीएल संयोजक आणि बीसीसीआय यांचे विशेष आभार, त्यांनी दिलेल्या प्रत्येक संधीसाठी. पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Ravichandran Ashwin IPL Retirement
Sanju Samson: आशिया कपपूर्वी 'संजू'चा धमाका! एका चेंडूत चोपल्या 13 धावा; कसं आहे शक्य? Watch Video

अश्विनचा आयपीएल कारकीर्द

2009 मध्ये पदार्पण

आयपीएलमध्ये 221 सामने

गोलंदाजी : 7.20 च्या इकोनॉमीने 187 बळी

फलंदाजी : एक अर्धशतकासह 833 धावा

पाच संघांचे प्रतिनिधित्व : CSK, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स

2010 आणि 2011 मध्ये सीएसकेच्या विजयी मोहिमेचा महत्त्वाचा भाग

आयपीएल 2025 हंगामात सीएसकेकडून खेळताना 9 सामन्यांत फक्त 7 बळी

Ravichandran Ashwin IPL Retirement
Test Record: विराट की पुजारा? 103 कसोटीनंतर कुणाचा रेकॉर्ड आहे खास; वाचून वाटेल आश्चर्य

FAQs

रविचंद्रन अश्विनने कधी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली?
२०२५ मध्ये त्याने ट्विटरवर पोस्ट करत IPL मधून निवृत्तीची घोषणा केली.

अश्विन IPL 2026 मध्ये का खेळणार नाही?
कारण त्याने स्वतःहून IPL मधून निवृत्ती घेतली असून आता तो इतर लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

अश्विनने IPL मध्ये किती सामने खेळले आहेत?
त्याने IPL मध्ये २२१ सामने खेळले.

त्याने एकूण किती विकेट्स घेतल्या आहेत?
अश्विनने ७.२० च्या इकोनॉमीने १८७ बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com