Ratan Tata
Ratan Tata Dainik Gomantak

रतन टाटांचे संरक्षणक्षेत्रात पाऊल 'हवाई दलासाठी' बनविणार विमाने

C-295 विमाने हवाई दलाच्या (Air Force)जुने झालेल्या एवरो-748(Avro-748) या विमानांच्या ऐवजी समावेश होतील. येत्या 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळणार आहेत. बाकीचे सर्व 40 विमाने भारत बनवणार आहे.
Published on

संरक्षण मंत्रालयाकडून(Ministry of Defense) ‘C-295’ या मालवाहतूक 56 विमानांची खरेदी करण्यासाठी स्पेनमधील (Spain) Airbus डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास 22000 कोटी रुपयांच्या कराराचा ठराव मंजूर झाला. संरक्षणा क्षेत्रातील कॅबिनेट कमिटीने याला हिरवा झेंडा दाखविला होता. यामधील महत्वाची बाब म्हणजे ही सर्व विमाने भारतात बनविणार आहे. आणि ही विमाने टाटा यांच्या समवेत Airbus या विमानांचे उत्पादन करतील. ही राफेलनंतरची दुसरी मोठी डील आहे. त्यामध्ये भारतीय कंपनीसोबत केली केली आहे.

यामुळे येणाऱ्या काही वर्षांत भारतात 6000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच सोबत देशातील हवाई क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञाननाच्या विकासात प्रगती होईल. संरक्षण मंत्रालयाकडून हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पमध्ये खासगी कंपनी भारतीय लष्करासाठी विमाने बनवतील. भारतीय लष्करासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) हे विमानांची निर्मिती करत होते. आणि त्याची जबाबदारी ही त्यांच्या वरच होती. मात्र आता पहिल्यांदाच खासगी कंपनी लष्करी विमानांची निर्मिती करतील.

Ratan Tata
खुशखबर! टाटा एससीव्हीची किंमत झाली कमी

या डीलमध्ये 16 विमाने Airbus डिफेन्स स्पेनवरून मागवली जातील. उर्वरित अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील 10 वर्षांच्या काळात बनविण्यात येतील. या प्रकल्पासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या या ठिकाणी जागेचा शोध सुरु आहे. तसेच गुजरात आणि उत्तर प्रदेशामध्ये देखील असा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. भारतात 2012 पासूनच C295MW ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टच्या दिशेने वाटचाल सुरु आहेत. त्याचा प्रस्ताव सीसीएसकडे पाठविण्यात आलेला होता. C-295 विमाने हवाई दलाच्या जुने झालेल्या Avro-748 या विमानांच्या ऐवजी समावेश होतील. येत्या 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळणार आहेत. बाकीचे सर्व 40 विमाने भारत बनवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com