रामभक्तांसाठी खूशखबर! जानेवारीत खुले होऊ शकते राम मंदिर, योगींचे जनतेला उद्घाटनासाठी आमंत्रण

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आमंत्रित केले आहे.
Ram Mandir Opening
Ram Mandir Opening Dainik Gomantak

Ram Mandir Opening: देशातील करोडो राम भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिर जनतेसाठी खुले होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका सरकारी निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आलीय.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आमंत्रित केले आहे.

'रामजानकी पथ आणि भक्ती पथच्या विकासासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत. राम भक्तांची गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानक या दोन्हींचा विस्तार करण्यात येत आहे. श्री रामजन्मभूमी आणि हनुमान गढी मंदिरात भक्तांना येणे जाणे सुलभ करणे हा यामगील उद्देश आहे.उद्धाटन संबधित सर्व कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी राम मंदिराशी संबंधित सर्व प्रकल्पांवर लक्ष ठेवले जात आहे.' असे यूपी सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

उत्तर प्रदेश सरकार राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाची तयारी करत आहे आणि अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्टेशनच्या विस्तारासह पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर वेगाने काम करत आहे. दर काही दिवसांनी सीएम योगी स्वतः राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी करत आहेत. यावरूनच राम मंदिराबाबत यूपीचे मुख्यमंत्री किती सक्रिय आहेत याचा अंदाज लावता येतो.

Ram Mandir Opening
Patna High Court: 'कर्ज परतफेडीसाठी जबरस्तीने वाहन जप्ती चुकीची,' हायकोर्टाचा निर्वाळा

उद्घाटनासाठी, उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या विस्तारासह पायाभूत सुविधांच्या कामांना गती दिली आहे. सहादतगंज ते नया घाट या 13 किमी लांबीच्या रामपथावरही काम सुरू आहे.

विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचाही विस्तार करण्यात येत आहे. रामजन्मभूमी मार्गाची रुंदी 30 मीटर आणि भक्ती पथाची रुंदी 14 मीटर असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या रामजन्मभूमी मंदिरात प्रभू रामललाच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु यावर्षी ते होईल अशी अपेक्षा आहे. असे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले होते. तसेच, मंदिराचे उद्धाटन यावर्षी 31 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या म्हणजेच 15 जानेवारी या काळात कोणत्याही शुभ दिवशी केले जाऊ शकते. असेही चंपत राय म्हणाले होते.

असे आहे राम मंदिर

राम मंदिर पूर्वेकडून पश्चिमेकडे 380 फूट लांब, दक्षिणेकडून उत्तरेकडे 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच आहे. शुद्ध ग्रॅनाइटने बनवलेले व्यासपीठ 16 फूट उंच आहे आणि त्याच्या तीन मजल्यांवर 392 स्तंभ आहेत. त्याच्या बांधकामात कुठेही लोखंड आणि काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही. असे राय हरिद्वारमध्ये झालेल्या एका बैठकीत म्हणाले.

Ram Mandir Opening
Kerala Crime News: "आधी तीन मुलांची हत्या आणि मग..." वाचा, केरळमधील हृदयद्रावक घटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com