Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी प्रकरणात 9 जण गजाआड, जाणून घ्या

Gujarat Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Gujarat s Morbi Cable Bridge Collapse
Gujarat s Morbi Cable Bridge CollapseTwitter/ @ANI

Gujarat Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, अपघातानंतर दुसऱ्या दिवशी राजकोट रेंजचे आयजी अशोक यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या तपासाची स्थिती स्पष्ट केली. यावेळी त्यांनी या अपघातात अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची संपूर्ण माहिती दिली.

दरम्यान, अशोक यादव म्हणाले की, 'ही अत्यंत दुःखद घटना आहे.' 30 तारखेला एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये IFSC च्या कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान आयजीही अनेक प्रश्न टाळताना दिसले.

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse
Gujarat: मोरबीमध्ये भीषण अपघात, झुलता पूल कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू

नऊ जणांना अटक करण्यात आली

आयजी पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नऊ जणांचे प्रोफाईल असे आहे...'

1. दीपक भाई नवीनचंद्र भाई पारेख (ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक)

2. नवीन भाई मनसुख भाई दवे (ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक)

3. मनसुख भाई वालजीभाई टोपिया (टिकट क्लार्क)

4. मदन भाई लाखा भाई सोलंकी (टिकट क्लार्क)

5. प्रकाशभाई लालजीभाई परमार (ब्रिज रिपेयरिंग कॉन्ट्रेक्टर)

6. देवांग भाई लालजीभाई परमार (ब्रिज रिपेयरिंग कॉन्ट्रेक्टर)

7 अल्पेश गोहिल (सुरक्षा रक्षक)

8. दिलीप गोहिल (सुरक्षा रक्षक)

9. मुकेश भाई चौहान (सुरक्षा रक्षक)

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse
Gujarat Election जिंकण्यासाठी भाजपचे 'ब्रह्मास्त्र'! हा मुद्दा पुन्हा सत्ता मिळवून देणार?

50 लोकांची टीम

आयजींनी पुढे सांगितले की, 'आज तपासाचा दुसरा दिवस आहे. जशी नाव समोर येतील तशाप्रकारे पोलीस कारवाई करतील. कोणालाही सोडण्याचा आमचा हेतू नाही. 50 जणांचे पथक तपासात गुंतले आहे.' आयजी पुढे म्हणाले की, 'या अपघातावेळी भलेही मोठा पोलीस बंदोबस्त असला तरी मोरबीच्या जनतेने मोठे सहकार्य केले. मग ते रुग्णवाहिकेची व्यवस्था असो किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असो.'

हा अपघात होता

मोरबीतील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजूनही नदीत लोकांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी (Police) सांगितले की, 'मच्छू नदीवरील झुलता पूल काल संध्याकाळी अचानक कोसळला, त्यामुळे अनेक लोक नदीत पडले. त्यानंतर गदारोळ झाला. रविवारी झालेल्या अपघातानंतर सोमवारीही मदतकार्य सुरु आहे. या अपघातात इतर अनेक जण जखमी झाले आहेत.'

Gujarat s Morbi Cable Bridge Collapse
Gujarat Assembly Elections: भाजपने मागील 32 वर्षात किती मुस्लिमांना दिली उमेदवारी, जाणून घ्या

PM उद्या जाणार

मच्छू नदीवरील झुला पूल दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंगळवारी दुपारी स्वत: मोरबीला भेट देणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सोमवारी ट्विट करुन ही माहिती देण्यात आली आहे. मच्छू नदीवरील झुला पूल कोसळल्यानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मंगळवारी दुपारी मोरबीला भेट देणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही ते भेट घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com