'आतंकवाद ना तो नोटबंदी से रुका ना .....,' राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

जम्मू -काश्मीरमध्यसतत होत असलेल्या हल्ल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
Rahul Gandhi slams on Modi Government cause of Jammu Kashmir terrorist attack
Rahul Gandhi slams on Modi Government cause of Jammu Kashmir terrorist attackDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे आता देशातील राजकारण तापताना दिसत आहे. सध्याचा विचार करता काश्मिरात तीन दिवसांत पाच नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत (Jammu Kashmir Attack) . आणि आता या हत्येसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला (Modi Government) लक्ष्य केले आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले, "काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. नोटाबंदीमुळे किंवा कलम 370 हटवून दहशतवाद थांबला नाही - केंद्र सरकार सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आम्ही आमच्या काश्मिरी बंधू आणि भगिनींवर झालेल्या या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो."असा शब्दात राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष केले आहे. (Rahul Gandhi slams on Modi Government cause of Jammu Kashmir terrorist attack)

आज दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात एका महिलेसह दोन सरकारी शाळेच्या शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली आहे . एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह भागात दहशतवाद्यांनी सकाळी 11.15 च्या सुमारास दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली."

तत्पूर्वी काळ झालेल्या हल्ल्यातदहशतवाद्यांनी सुमारे दीड तासात तीन जणांचा बळी घेतला होता . काश्मिरी पंडित मखनलाल बिंद्रू यांची श्रीनगर येथील फार्मसीमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती . बिंद्रू हे त्यांच्या समाजातील काही लोकांपैकी एक होते ज्यांनी 1990 मध्ये दहशतवादाच्या उद्रेकानंतर काश्मीर सोडले नाही.

Rahul Gandhi slams on Modi Government cause of Jammu Kashmir terrorist attack
भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अडवाणींनाही मिळालं स्थान

बिंद्रूची हत्या केल्यांनतर काही मिनिटांनंतर लगेचच दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील हवाल चौकाजवळ बिहारच्या भागलपूर येथील रहिवासी वीरेंद्र पासवान नावाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याला गोळ्या घातल्या होत्या यानंतर दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील नायदखई येथे मोहम्मद शफी लोन यांचीही गोळ्या घालून हत्या केली होती.

आणि या सततच्या हल्ल्यामुळेच आता काँगेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com