भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागला: राहुल गांधी

प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची कट्टरता देशाला आतून कमकुवत करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अंतर्गत विभाजनामुळे भारत बाहेरुन कमकुवत होत आहे. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने आपल्याला केवळ दुरावलेच नाही, तर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमाही खराब केली आहे. (Rahul Gandhi has said that the BJP's bigotry has tarnished India's image in the world)

त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सोमवारी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, देशात आर्थिक मंदी स्पष्टपणे दिसत आहे, मात्र या सरकारकडे 'आर्थिक दिवाळखोरी' वर कोणतेही उत्तर नाही. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज देशातील दरडोई उत्पन्नही कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Rahul Gandhi
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ईडीने बजावले समन्स

दरम्यान, राहुल गांधींनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतीय कुटुंबांना महागाई आणि नोकऱ्या गमावण्याचा फटका बसत आहे. आज दरडोई उत्पन्न दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमी आहे. दरडोई उत्पन्न 94,270 रुपयांवरुन 91,481 रुपयांवर आले आहे. भारताची आर्थिक मंदी स्पष्टपणे दिसत आहे. धोरणात्मक दिवाळखोरीमुळे त्रस्त असलेल्या भाजप सरकारकडे याचे उत्तर नाही.''

Rahul Gandhi
भारत चांगल्या स्थितीत नाही - राहुल गांधी, भाजपची जोरदार टीका | Gomantak Tv

तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी सांगितले की, द्वेषामुळे केवळ द्वेष निर्माण होतो आणि हीच भारताला (India) एकत्र करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि बंधुभावच भारताला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो, असेही राहुल म्हणाले. "जोडो इंडिया" हॅशटॅगसह राहुल गांधींनी ट्विट केले. "केवळ द्वेषाने द्वेष निर्माण होतो. प्रेम आणि बंधुभावाचा मार्गच भारताला प्रगतीकडे नेऊ शकतो. भारताला एकत्र आणण्याची हीच वेळ आहे.''

तसेच, काँग्रेसच्या (Congress) उदयपूर अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या 'भारत जोडो यात्रे' च्या तयारी आणि योजनांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या बैठकीत हजेरी लावल्यानंतर राहुल यांनी हे वक्तव्य केले. भारतीय जनता पक्ष (BJP) ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले की, "भाजपने पसरवलेल्या द्वेषाने देश उद्ध्वस्त केला आहे... जर तुम्हाला देश वाचवायचा असेल तर एकत्र या.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com