पंजाब (Punjab) आणि इतर काही ठिकाणी जमावाकडून झालेल्या कथित लिंचिंगच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी 'लिंचिंग' हा शब्दही ऐकला नव्हता असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, संसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पत्रकाराने विचारले असता त्यावर आपण सरकारसाठी काम करता का, असा सवाल करत गांधी यांनी त्यानांच फटकारले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आज पुन्हा एकदा मीडियावर सडकून टीका केली.
गेल्या आठवड्यात मॉब लिंचिंगच्या दोन घटनांनी पंजाब हादरला होता. संतप्त जमावाने हे कृत्य केल्याच्या संशयावरुन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. पंजाबमध्ये सध्या मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार आहे.
गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Ajay Kumar Mishra) यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर सातत्याने दबाव आणत आहेत. मंगळवारी त्यांनी संसद संकुलातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी विरोधकांचे नेतृत्व करताना राहुल गांधी म्हणाले की, 'मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांची हत्या केली. एसआयटीच्या अहवालात हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. परंतु पंतप्रधान गृहमंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. पंतप्रधानांनी शेतकर्यांची माफी मागितली परंतु त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून गृहराज्यमंत्र्यांना हटवले नाही. यादरम्यान मीडियाने राहुल गांधींना 'लिचिंग'वर प्रश्न केला, त्यावर राहुल गांधी भडकले. 'सरकारची दलाली करु नका', असे म्हणत राहुल गांधी यांनी माध्यमांवर सडकून टीका केली.
राहुल यांच्या ट्विटवर भाजपचा पलटवार
वास्तविक, राहुल गांधी यांनी मंगळवारी 'लिंचिंग' बाबत एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी नेत्याने म्हटले की, '2014 पूर्वी लिंचिंग हा शब्द ऐकला नव्हता. धन्यवाद मोदीजी!' राहुल यांच्या या ट्विटवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनी प्रतिक्रिया दिली. मालवीय यांनी 1984 च्या शीख दंगलीनंतर राजीव गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'मॉब लिंचिंगचे जनक राजीव गांधीं यांना भेटा. त्यांनी शिखांच्या नरसंहाराला न्याय दिला आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरली. रक्ताचा बदला रक्ताने घ्या असा नारा दिला.'
पंजाबमध्ये अपवित्र प्रकरणी दोन जणांची 'लिंचिंग'
पंजाबमधील गुरुद्वारांमध्ये अपवित्र प्रकरणी दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. यानंतर राहुल गांधींनी 'लिंचिंग' वर आपले मत मांडले आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात कथित अपवित्र प्रकरणी शनिवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, तर कपूरथला येथील गुरुद्वारामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.