अर्थसंकल्पावरून राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींची सरकारवर टीका

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
Rahul Gandhi and Mamata Banerjee
Rahul Gandhi and Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने आज (मंगळवार) संसदेत अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळेस अनेक घोषणा केल्या आहेत. कोरोनाकाळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (Union Budget 2022 News)

Rahul Gandhi and Mamata Banerjee
Budget 2022 : 'नल से जल' योजनेसाठी 60,000 कोटींची तरतूद

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले; तर कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यानी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे (Twitter) आपले मत व्यक्त केले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'M0di G0vernment’s Zer0 Sum Budget!', म्हणजेच 'मोदी सरकारचे झीरो सम बजेट'. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला, गरीब लोकांना, मध्यम उद्योगांना, शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीय लोकांना या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.

Rahul Gandhi and Mamata Banerjee
YouTube वर मोदींचा बोलबाला, पंतप्रधान मोदी 1 कोटी सबस्क्राइबर्ससह अव्वल

राहुल गांधी यांच्या पाठोपाठ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीदेखील अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ट्वीट करत सरकारला टोला लगावला. 'बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही', असे खोचक ट्वीट त्यांनी केले आहे. आगामी काळात विविध राजकीय नेते अर्थसंकल्पावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com