दिग्गज उद्योजक डॉ. राहुल बजाज यांचे निधन

भारतातील प्रसिध्द उद्योेगपती राहुल बजाज यांचे आज निधन झाले.
Rahul Bajaj
Rahul Bajaj Dainik Gomkantak
Published on
Updated on

भारतातील प्रसिध्द उद्यगोपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज निधन झाले. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती . भारतीय उद्योगातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते. 10 जून 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण पूर्ण घेतले होते. 1968 मध्ये त्यांनी बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. बजाज ऑटोला नावारुपाला आणण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. 2001 मध्ये बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली

राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल 7.2 कोटींवरुन 12 हजार कोटींपर्यंत पोहोचली होती. स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. 2005 मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान पुत्र राजीव बजाज यांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.

Rahul Bajaj
इंडियन रेल्वे प्रवाशांना देणार व्हॅलेटाईंन डे च्या दिवशी स्पेशल गिफ्ट

दरम्यान, जमनालाल बजाज (1889-1942) हे त्यांच्या काळातील एक यशस्वी उद्योगपती होते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधींचे सहकारी होते. 1926 मध्ये त्यांनी सेठ बच्छराज नावाची एक फर्म स्थापन केली होती. बच्छराज अँड कंपनी त्यांनी स्थापन केली. 1942 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी त्यांच्या निधनानंतर, त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली.

Rahul Bajaj
फेस्टिवल स्पेशल ट्रेन'; सणासुदीत प्रवाशांना रेल्वेचं गिफ्ट

1948 मध्ये, कंपनीने आयात केलेल्या कम्पोनेंट्सपासून असेम्बल्ड केलेली टू-व्हीलर आणि थ्री व्हीलर बाजारात आणली. पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने कुर्लामध्ये उत्पादन कारखाना उभारला. जो नंतर आकुर्डीमध्ये हलविण्यात आला. इथेच बजाज कुटुंबाने फिरोदियाझ यांच्यासोबत भागीदारी करुन दुचाकी आणि तीनचाकी वाहने तयार करण्यासाठी स्वतंत्र संयंत्रे उभारली. 1960 मध्ये कंपनीचे नाव बदलून बजाज ऑटो असे करण्यात आले.

शिक्षकांना सांगितले 'तुम्ही बजाजला हरवू शकत नाही'

लहानपणी वर्गातून हाकलून दिल्यावर आपल्या शिक्षकांना 'तुम्ही फक्त बजाजला हरवू शकत नाही' असे म्हणणारा राहुल बजाज कोणाच्याही हाताखाली काम करु शकले नाही. राहुल बजाज आणि फिरोदिया कुटुंबात व्यवसायाच्या विभाजनावरुन वाद झाला होता. सप्टेंबर 1968 मध्ये दीर्घ कायदेशीर लढाईनंतर फिरोदियाजला बजाज टेम्पो मिळाला आणि राहुल बजाज बजाज ऑटोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी एस्कॉर्ट, एनफिल्ड, एपीआय, एलएमएल आणि कायनेटिक होते. त्या सर्वांचा टू व्हीलर मार्केटमध्ये 25% आणि तीन चाकी मार्केटमध्ये 10% वाटा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com