KFC ची गदारोळ माजवणारी पोस्ट; माफी मागुन मिटवलं प्रकरण

क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QRS) चेन केएफसीने सोमवारी सोशल मीडियावर काश्मीरशी संबंधित पोस्ट्सवर जनतेच्या संतापानंतर माफी मागितली आहे.
KFC Apologized
KFC ApologizedDainik Gomantak
Published on
Updated on

क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QRS) चेन केएफसीने सोमवारी सोशल मीडियावर काश्मीरशी संबंधित पोस्ट्सवर जनतेच्या संतापानंतर माफी मागितली (KFC Apologized) आहे. सोशल मीडियावर कंपनीच्या पाकिस्तानस्थित (Pakistan) फ्रँचायझीच्या पोस्ट्सने काश्मीरच्या फुटीरतावाद्यांचे समर्थन केले आहे. ट्विटरवर KFC इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या संदेशात असे लिहिले आहे की, "देशाबाहेरून KFC च्या काही सोशल मीडियावर प्रकाशित झालेल्या पोस्टबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करत आहोत. आम्ही भारताचा आदर करतो आणि सर्व भारतीयांची अभिमानाने सेवा करण्याच्या आमच्या संकल्प करतो.

KFC Apologized
UP Elections: अमित शहांचा आज यूपीसाठी जाहीरनामा, सीएम योगींची हजेरी

आणखी एक QSR चेन पिझ्झा हटने (Pizza Hut) देखील एक विधान जारी केले आहे की ते सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टच्या सामग्रीस सहमत किंवा समर्थन देत नाही, KFC च्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक मेसेज पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा देण्यात आला, पोस्टमध्ये लिहिले होते, 'कश्मीर कश्मीरकरांचा आहे'.

केएफसी ही यूएस-आधारित कंपनी यमची उपकंपनी आहे, यम कडे पिझ्झा हट आणि टॅको बेल सारख्या QSR ब्रँड्स पण आहेत. केएफसीने अधिकृतपणे बंगळुरूमध्ये (Bangalore) रेस्टॉरंट उघडून जून 1995 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आता भारतातील 450 हून अधिक रेस्टॉरंट्स आपल्या फ्रँचायझी भागीदारांद्वारे चालवते.

एवढा गदारोळ माजवणाऱ्या KFC ची पोस्ट प्रत्यक्षात काश्मीर एकता दिनानिमित्त पाकिस्तानात टाकण्यात आली होती, या काश्मीर एकता दिनी आम्ही त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी एकत्र उभे आहोत, असे या पोस्टमध्ये लिहिले गेले होते.

KFC Apologized
गरिबीपासून महामारीपर्यंत, पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला दिले उत्तर

याआधी रविवारी एका पाकिस्तानी डीलरने सोशल मीडियावर काश्मिरी फुटीरतावाद्यांचे समर्थन करणारी पोस्ट केल्यानंतर ह्युंदाई मोटर्सलाही (Hyundai Motor) अशाच अडचणीचा सामना करावा लागला होता. 'काश्मीर एकता दिवस'च्या समर्थनार्थ ह्युंदाई डीलरच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या संदेशात त्यांच्या लढ्याला 'स्वातंत्र्य लढा' असे संबोधण्यात आले आहे, या पोस्टनंतर ट्विटरवर 'बॉयकॅट ह्युंदाई' हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि अनेकांनी ह्युंदाईचे प्रोडक्ट न घेण्याचे आवाहन केले. यानंतर, ह्युंदाई मोटर्स इंडियाने सोशल मीडियावर एक संदेश जारी करून स्पष्ट केले की ते भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com