Punganur Cow: जगातील सर्वात लहान गाय 'ही' आहेत वैशिष्ट्ये

Punganur Cow: या भारतीय वंशांच्या गाई आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्यात आढळतात त्यामुळे त्यांना पुंगनुर गाई म्हणून ओळखलं जातं.
Punganur Cow
Punganur CowDainik Gomantak
Published on
Updated on

Punganur Cow: आपण सर्वांनीच देशी, विदेशी, हायब्रीड ,पांढऱ्या, काळ्या-पांढऱ्या, उंच, मध्यम उंचीच्या अशा अनेक प्रकारच्या गाई पाहिल्या आहेत. पण तुम्हाला अत्यंत कमी उंचीच्या गाई माहित आहेत का? विशेष म्हणजे या गाई भारतातच आढळतात.

या भारतीय वंशांच्या गाई आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्यात आढळतात त्यामुळे त्यांना पुंगनुर गाई म्हणून ओळखलं जातं.

शांत आणि निरागस दिसणाऱ्या जगातील सर्वात कमी उंचीच्या या पुंगनुर गोवंशाचा रंग हा पांढरा किंवा फिक्कट राखाडी असतो. रुंद कपाळ आणि मध्यम ते छोटी शिंगे आणि लहान पण काटक पाय असतात. दोन्ही शिंगांचा आकार एक समान नसतो. या गोवंशाची उंची ७० ते ९० सें. मी. आणि वजन सामान्यपणे ११५ ते १२० किलो पर्यंत असते.

या गाई दिवसाला ३ ते ५ लिटर दूध देतात. सामान्य गायींच्या दूधाचा फॅट ३ ते ४ टक्के असते, परंतु पुंगनुर गायींचे दुसरे एक वैशिष्ट्य त्यांच्या दुधात ८ टक्क्यांपर्यंत फॅट आढळते..शिवाय दुधामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम , कॅल्शिअम हे पोषक घटकदेखील आढतात. त्यामुळे पुंगनुर गायींचे दूध औषधी मानले जाते. इतकेच नव्हे तर हे दूध तिरुपती तिरुमाला मंदिरात प्रसाद बनवण्यासाठीही वापरतात. आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे सोन्यासाठी जो AU केमिकल सिंब्मॉल वापरतात तो या गाईच्या दूधात आढळतो.

या गाईंची किंमत एक ते दहा लाखांपर्यंत असू शकते.ही गाय इतकी गुणसंपन्न असूनही, दुर्लक्षित आहे. गेल्या काही काळात सरकाने केलेल्या प्रयत्नांमुळे लुप्त पावत चाललेला हा गोवंश पुन्हा एकदा संवर्धित होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com