पीटी उषा म्हणाल्या कुस्तीपटूंचे आंदोलन देशाची प्रतिमा मलिन करणारे, बजरंग पुनियाने दिले उत्तर

रस्त्यावर आंदोलन देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी दिली आहे.
Wrestlers Protest
Wrestlers Protest
Published on
Updated on

Wrestlers Protest: देशाचे स्टार कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर निषेध आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि कुस्तीगीरांना धमकावल्याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीसाठी हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. याप्रकरणी गुरुवारी (27 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली.

दरम्यान, रस्त्यावर आंदोलन देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी दिली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेत लैंगिक छळ विरोधी समिती आहे, रस्त्यावर उतरण्याऐवजी आंदोलक कुस्तीपटू आधी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आयओएमध्ये आले नाहीत. कुस्तीपटूंसाठी ही चांगली नसून, ती खेळासाठीही चांगले आहे, त्यांच्यामध्ये थोडी शिस्त असली पाहिजे. यामुळे भारताची प्रतिमा मलिन होत आहे. असे पीटी उषा म्हणाल्या.

पीटी उषा यांच्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयओए अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडून आम्हाला अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, आम्हाला त्यांच्याकडून पाठिंबा अपेक्षित होता. असे पुनिया म्हणाला.

Wrestlers Protest
CDSCO: सावधान! देशातील 48 औषधे आणि ही टूथपेस्ट मानाकंन चाचणीत फेल, सेवन ठरू शकते धोकादायक

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांनी गुरुवारी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिस आयुक्तांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे. रेखा शर्मा म्हणाल्या की, आम्ही मीडियाशी बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की आम्ही काही करत नाही.

आम्ही दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी एफआयआर का नोंदवला नाही, अशी विचारणाही आम्ही त्यांना केली आहे. यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार आली असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात तक्रारदाराच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्याचाही समावेश आहे. त्यांना त्यांची नावे उघड करायची नाहीत. हेच कारण आहे की आम्ही मीडियाशी याबद्दल बोलत नव्हतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com