Hypersonic Missile: भारत लवकरच बनवणार सर्वात धोकादायक हायपरसोनिक मिसाईल, DRDO करतयं 'प्रोजेक्ट विष्णू'वर काम

Project Vishnu DRDO: सीमेवरील वाढती आव्हाने लक्षात घेता भारत आपली लष्करी शक्ती मजबूत करण्यात व्यस्त आहे.
Project Vishnu DRDO
Hypersonic MissileDainik Gomantak
Published on
Updated on

India Hypersonic Missile Development: सीमेवरील वाढती आव्हाने लक्षात घेता भारत आपली लष्करी शक्ती मजबूत करण्यात व्यस्त आहे. भारताने आपली क्षेपणास्त्र शक्ती नवीन उंचीवर नेण्याची तयारी देखील सुरु केली आहे. 'प्रोजेक्ट विष्णू' आता शत्रूंची झोप उडवणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) या प्रोजेक्टवर वेगाने काम करत आहे. असा दावा केला जात आहे की, हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असेल.

शक्ती संतुलन बदलणार!

दरम्यान, या प्रोजेक्टतर्गंत डीआरडीओ (DRDO) एकाच वेळी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे. ही क्षेपणास्त्रे इतकी वेगवान असतील की, संपूर्ण आशियातील शक्ती संतुलन बदलण्याची त्यांची क्षमता असेल. त्यांच्या क्षेपणास्त्रांचा वेग मॅक 8 म्हणजेच सुमारे 11,000 किलोमीटर प्रति तास असेल. अशाप्रकारचे तंत्रज्ञान विकसित करुन भारत अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या देशांच्या पंक्तित बसेल.

Project Vishnu DRDO
India's Hypersonic Missile: भारताची लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

हल्ल्यासोबतच हवाई सुरक्षा आणखी मजबूत होणार

प्रोजेक्ट विष्णूद्वारे केवळ हल्ला करणारी क्षेपणास्त्रेच बनवली जाणार नाहीत, तर त्याअंतर्गत एक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र प्रणाली देखील बनवली जाईल, जी शत्रूच्या क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला नष्ट करेल. याचा अर्थ असा की, भारताची हवाई सुरक्षा देखील पूर्वीपेक्षा अनेक पटीने मजबूत होण्याची शक्यता आहे.

पुढील 5 वर्षांत तयारीची योजना

डीआरडीओने 2030 पर्यंत हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (एचजीव्ही) तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. यानंतर, काही मिनिटांत पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला लक्ष्य केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, शत्रूला या क्षेपणास्त्रांना रोखणे जवळजवळ अशक्य होईल.

Project Vishnu DRDO
Shaheen Pakistan Missile: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानचा पलटवार; तरीही भारताच्या S-400 पुढे 'शाहीन'ची गेली हवा

दुसरीकडे, या क्षेपणास्त्रांमध्ये प्रगत नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणाली असेल. याशिवाय, ते शत्रूच्या रडारलाही चुकवू शकतील. ET-LDHCM नावाच्या क्षेपणास्त्रांमध्ये स्क्रॅमजेट इंजिन असेल, जे त्यांना हायपरसोनिक गती देईल. DRDO ने त्याच्या सुरुवातीच्या चाचण्या देखील केल्या आहेत. विशेष म्हणजे ते मोबाईल लाँचर, विमान किंवा नौदलाच्या युद्धनौकेवरुन कुठूनही डागता येतात.

Project Vishnu DRDO
Indian Supersonic Missile: शत्रूची दाणादाण उडवतं भारताचं 'हे' क्षेपणास्त्र, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

क्षेपणास्त्रांची रेंज 2000 किलोमीटरपर्यंत असणार

दरम्यान, या क्षेपणास्त्रांची रेंज सुमारे 2000 किलोमीटर असेल आणि ती पारंपारिक ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतील. चीनसारख्या देशांच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना त्यांना पकडणे सोपे होणार नाही. प्रोजेक्ट विष्णू पूर्ण होताच भारताकडे (India) जगातील सर्वात प्रगत आणि प्राणघातक हायपरसोनिक क्षेपणास्त्र शक्ती असेल जी कोणत्याही शत्रूसाठी सर्वात मोठी भीती ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com