PM मोदींचा आज गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस, केवडियात मिशन लाइफ करणार सुरू

PM Modi In Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या गुजरात (Gujrat) दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान पीएम मोदी केवडियामध्ये मिशन लाइफ लाँच करणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेसही उपस्थित राहणार आहेत. आजचा दिवस गुजरातसाठी खास असणार आहे कारण पीएम मोदी येथे हवामान बदल रोखण्यासाठी ठोस पावले उचलणार आहेत.

निवडणुकीच्या (Election) वर्षात पंतप्रधान मोदी भेटवस्तूंचा डबा घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी येथे डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन केले. तसेच अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. स्कूल ऑफ एक्सलन्सचेही उद्घाटन करण्यात आले. पीएम मोदी म्हणाले की विकसित भारतासाठी विकसित गुजरात बनवण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. 

  • पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

PM मोदी सकाळी 9:45 वाजता केवडिया येथे मिशन लाइफ लाँच करतील. केवडिया येथे 12 वाजता मिशन प्रमुखांच्या 10 व्या परिषदेत सहभागी होणार असून त्यात 120 देशांचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते तापी जिल्ह्यातील व्यारा येथे दुपारी 3.45 वाजता जातील, तेथे ते 1970 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

  • मिशन लाइफ काय आहे

मिशन लाइफच्या शुभारंभाच्या वेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस उपस्थित राहणार आहेत. COP26 शिखर परिषद नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो येथे हवामान बदलासंदर्भात आयोजित करण्यात आली होती. COP26 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी मिशन लाइफ लाँच केले होते. यामध्ये जीवन म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली. या मोहिमेचा उद्देश वैयक्तिक आणि समुदाय स्तरावर मॅक्रो उपाय आणि कृती अंमलात आणून हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करणे हा आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com