PM Modi Punjab Visit: पंतप्रधान मोदी आज हरियाणा आणि पंजाब दौऱ्यावर

PM Modi : पंतप्रधान मोदी फरिदाबादमधील 'अमृता हॉस्पिटल' आणि मोहालीमध्ये 'होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'चे उद्घाटन करतील.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाब दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जनतेला महत्त्वाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही राज्यात प्रत्येकी एका रुग्णालयाचे उद्घाटन करतील. पीएमओने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले आहे की, पीएम मोदी हरियाणातील फरिदाबाद येथील 'अमृता हॉस्पिटल' आणि त्यानंतर न्यू चंदीगड, मोहाली, पंजाब येथील 'होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'ला भेट देउन त्याचे उद्घाटन करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज सकाळी 11 वाजता हरियाणातील फरिदाबादला पोहोचणार आहेत. जिथे अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर पीएम मोदी दुपारी 02:15 वाजता मोहालीमध्ये 'होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'चे उद्घाटन करतील.

PM Modi
Delhi Liquor Policy Case: सिसोदियांच्या अडचणी वाढल्या, CBI नंतर आता ED चा फेरा

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये 2,600 बेडच्या अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याद्वारे फरीदाबादच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आधुनिक औषधी पुरविण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे रुग्णालय माता अमृतानंदमयी मठाकडून चालवले जात आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हरियाणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबला जाणार आहेत, जिथे ते मोहालीमध्ये 'होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'चे उद्घाटन करणार आहेत. हे टाटा मेमोरियल सेंटरने 660 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. या रुग्णालयात रुग्णांना शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी- केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com