PM Modi ISRO Visit: ग्रीस दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी थेट बंगळुरूमध्ये दाखल, इस्रोच्या वैज्ञानिकांचे केले अभिनंदन! पाहा Video

PM मोंदीनी आज सकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केले आहे.
PM Modi ISRO Visit:
PM Modi ISRO Visit:Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi In Bengaluru: आज सकाळी पंतप्रधान मोदी ग्रीस दौऱ्यावरून थेट बंगळुरूमध्ये दाखल झाले. त्यांनी इस्रोच्या वैज्ञीनिकांची भेट घेत 'चांद्रयान-3' च्या यशाबद्दल पाठ थोपटून केले अभिनंदन केले. ही मोहिम पार पडली तेव्हा मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विट करत शेअर केले आहे.

चांद्रयान-३ मोहिम यशस्वीपणे पार पाडून भारताने जगात इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यामागे इस्रोच्या वैज्ञानिकांचे अथक परिश्रम आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रो टीमच्या महिला शास्त्रज्ञांची भेट घेत अभिनंदन केले. याचा व्हिडिओ देखील एएनआयने ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमधील इस्रोच्या मिशन कंट्रोल सेंटरवर जात त्यांनी सर्व वैज्ञानिकांची भेट घेतली. इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ, माजी प्रमुख के. सिवान आणि इतर सर्व वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी सोमनाथ यांनी मोदींनी मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या लँडर रोव्हर प्रतिकृतींमधून चांद्रयान- 3 ची अधिक माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com