पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले लतादीदींचे अंत्यदर्शन

लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार्‍या अनेक सेलिब्रेटींपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत पोहोचले आहेत.
Lata Mangeshkar Funeral
Lata Mangeshkar FuneralDainik Gomantak
Published on
Updated on

लता मंगेशकर यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याच्या काही तासांनंतरच या दिग्गज गायिकेला येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची तयारी आधीच सुरू आहे. तयारी जोरात सुरू असल्याची खात्री करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते.

Lata Mangeshkar Funeral
EDच्या भीतीने मायावती शांत, अखिलेश यादवांची विजयी वाटचाल सुरु: राऊतांनी भाजपला डिवचलं
Summary

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले, त्यावेळी प्रोटोकॉलसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राजशिष्टाच्यार मंत्री आदित्य ठाकरे, तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार्‍या अनेक सेलिब्रेटींपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) मुंबईत पोहोचणार आहेत. लता दीदींना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी काही वेळाने मुंबईला रवाना होणार आहेत, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल चहल हे देखील शिवाजी पार्कवर आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधून सांगितले.

पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कवर पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5:45-6:00 वाजता अंत्यसंस्कारस्थळी पोहोचतील, त्यानंतर लता मंगेशकर यांचे अंतिम संस्कार संध्याकाळी 6:15-6:30 वाजता केले जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल एएनआयचे ट्विट केले.

Lata Mangeshkar Funeral
लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार

त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉ. प्रतित समदानी यांनी रविवारी सकाळी रुग्णालयाबाहेर माध्यमांची भेट घेतली. ते म्हणाले, आम्ही सकाळी 8:12 वाजता लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाची घोषणा करत आहोत. कोविड-19 (Covid-19) नंतर 28 दिवसांहून अधिक दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com