Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Priest Crime News: आजार बरा करण्याच्या नावाखाली एका पेन्टेकोस्टल चर्चच्या पाद्रीने एका विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
sexual abuse attempt news
sexual abuse attempt newsDainik Gomantak
Published on
Updated on

कन्याकुमारी: तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजार बरा करण्याच्या नावाखाली एका पेन्टेकोस्टल चर्चच्या पाद्रीने एका विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कन्याकुमारी पोलिसांनी त्या पाद्रीला अटक केली आहे.

थुक्कलै भागातील एक तरुणी काही दिवसांपासून आजारी होती. उपचाराच्या आशेने तिने मेक्कमंडपम परिसरातील फुल गॉस्पेल पेन्टेकोस्टल चर्चमध्ये धाव घेतली. तिथे पाद्री रेगिमोनने तिला खासगी प्रार्थनेतून आजार बरा करण्याचे आश्वासन दिले. "तुमच्या आरोग्याच्या समस्या पतीसोबतच्या संबंधांमुळे आहेत. जर तुम्ही माझ्यासारख्या भविष्यवेत्त्यासोबत झोपलात तर तुम्ही बऱ्या व्हाल," असे त्याने त्या महिलेला सांगितले.

प्रार्थना सत्रादरम्यान पाद्री रेगिमोनने तिला मिठी मारून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तरुणीने प्रसंगावधान राखत तिथून सुटका करून घेतली आणि तात्काळ थुक्कलै पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी २६ जून २०२५ रोजी पाद्री रेगिमोनला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

sexual abuse attempt news
Sexual Harassment Case: खाकी वर्दीतील हैवान! ऑन ड्युटी कॉन्स्टेबलकडून पोलीस स्टेशनमधेच महिलेचा लैंगिक छळ; तब्बल 13 वर्षांनंतर मिळाला न्याय

पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतु आरोग्याच्या आणि इतर काही वैयक्तिक समस्यांमुळे ती माहेरी राहत होती. आध्यात्मिक उपचाराच्या आशेने नातेवाईकांनी तिला मेक्कमंडपम, पंडिविलाई येथील पाद्री रेगिमोनच्या चर्चमध्ये नेले होते. तिथे रेगिमोनने तिला सांगितले की, जर तिने तिच्या उत्पन्नाच्या १०% हिस्सा चर्चला दिला, तर तिचे शारीरिक आजार बरे होतील. उपचाराच्या नावाखाली झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com