
Viral Lion Video: सोशल मीडियावर (Social Media) वन्यजीवनाशी (Wildlife) संबंधित व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सिंहांचा कळप (Pride of Lions) भर रस्त्यावर मोकळेपणाने फिरताना दिसत आहे. या दृश्याने केवळ वाहतूकच थांबली नाहीतर ते पाहणाऱ्यांचा श्वासही थांबला. हा व्हिडिओ इतका धक्कादायक आहे की, लोक तो पाहून थक्क झाले असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, हा रोमांचक आणि भीतीदायक व्हिडिओ नेमका कधी आणि कुठला आहे, याची खात्री अद्याप पटलेली नाही. परंतु व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिंहांचा एक कळप रस्त्यावर उतरला आहे, ज्यामुळे रस्त्यावर धावणारी वाहने थांबली आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंह आणि सिंहीण मोठ्या आरामात रस्त्यावर (Road) फिरत आहेत, जणू त्यांना कोणाचीही पर्वा नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 25 लाख लोकांनी पाहिला असून, 42 हजार लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, "हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील (Movie) दृश्यासारखा वाटतो, पण ही वस्तुस्थिती आहे." तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, "सिंहांचा इतका आत्मविश्वास पाहून मजा आली, पण मानवी वस्तीजवळ त्यांची उपस्थिती ही चिंतेची बाब आहे."
या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने @Grok ला टॅग करुन या घटनेबद्दल माहिती मागितली. @Grok ने सांगितले की, हा व्हिडिओ सप्टेंबर 2018 मधील असून, ब्रिटनमधील वॉर्सेस्टरशायर (Worcestershire) येथील बेव्डली (Bewdley) येथील वेस्ट मिडलँड्स सफारी पार्कचा (West Midlands Safari Park) आहे. जिथे सिंहांच्या कळपात झालेल्या भांडणादरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडिओ वन्यजीवांच्या जवळच्या आणि धोकादायक भेटीचा एक दुर्मिळ क्षण दाखवतो, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.