Budget Session: आज 31 जानेवारीला २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आहे. त्यांनी केलेल्या अभिभाषणात सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख करताना त्यांनी कौतुक केले. त्यानंतर सभागृहात मोठा जोश पाहायला मिळाला आहे. चला जाणून घेऊयात राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात कोणते मुद्दे मांडले आहेत.
संसदेची ही वास्तू अमृत कालाच्या सुरुवातीला बांधली गेली आहे. ही नवीन इमारत धोरणांची पूर्तता करेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
राम मंदिराची निर्मिती ही अनेक शतकांपासूनची आकांक्षा होती. ही आकांक्षा आता पूर्ण झाली आहे. असे म्हणताच सभागृहात जय श्री राम अशा घोषणा देण्यात आल्या आणि टेबल वाजवून आनंद व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
गरीबी कमी करण्याचे किंवा नष्ट करण्याचे काम या सरकारने केले आहे. निती आयोगाच्या म्हणण्यानुसार, एका दशकाच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासी गरीबीतून बाहेर आले आहेत.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका होत्या पण आज तो इतिहास आहे. राष्ट्रपती म्हणाले की, याच संसदेने तिहेरी तलाकविरोधात कठोर कायदा केला आहे.
संसदेने शेजारील देशांतून येणाऱ्या अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा कायदा केला आहे.
सरकारने वन रँक, वन पेन्शनही लागू केली आहे.
अशा आशयाचे मुद्दे राष्ट्रपतींच्या भाषणात ऐकायला मिळाले आहेत. या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.