Explained: कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती, आज होणार मतदान

Presidential Election 2022 Live Updates: देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा?
Presidential Election 2022 Live Updates:
Presidential Election 2022 Live Updates: Dainik Gomantak
Published on
Updated on

देशाचा नवा राष्ट्रपती कोण होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. भाजपने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतील हॉटेल ट्रायडंट मध्ये आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

* कसे आहे मतांचं गणित

  • राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4809 मतदार, मतांचं एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431

  • लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार, खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 200

  • सर्व राज्यांतील 4033 आमदार मतदार, प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य वेगवेगळं

  • विविध राज्यांतील आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 231

  • सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे.

* कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

  • ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म झाला

  • सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश केला

  • 1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या

  • 2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री

  • 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती

* कोण आहेत यशवंत सिन्हा?

  • बिहारच्या पाटणामध्ये 6 नोव्हेंबर 1937 रोजी जन्म

  • 1960 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल, 24 वर्षे प्रशासकीय सेवा

  • 1990 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये अर्थमंत्री, 1998 ते 2004 वाजपेयी सरकारमध्ये मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com