President Election: राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत या दिग्गजांची जोरदार चर्चा

देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरु झाली आहे.
President Election News
President Election NewsDainik Gomantak
Published on
Updated on

President Election 2022: देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरु झाली आहे. बुधवारी सुरु झालेल्या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी 11 जणांनी अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 जूनपर्यंत ठेवली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बुधवारी विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर मंथन झाले. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपच्या वतीने उमेदवाराच्या नावावर एकमत होण्यासाठी राजनाथ सिंह विरोधकांशी चर्चा करत आहेत. (president election 2022 names of the candidates that are going- around sharad pawar farooq abdullah)

दरम्यान, राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.

President Election News
Presidential Election: पहिल्याच दिवशी लालू प्रसाद यादवांचा उमेदवारी अर्ज 'रिजेक्ट'

फारुख अब्दुल्ला यांचे नाव समोर आले

दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये, बुधवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत विरोधी पक्षांच्या वतीने शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली. मात्र, शरद पवार यांनी आपण उमेदवार होणार नसल्याचे स्पष्ट केले. पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधक नव्या नावाच्या शोधात आहेत.

दुसरीकडे, बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली तर बरे होईल, असे म्हटले आहे. अन्यथा एकत्रितरित्या दुसऱ्या उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाईल.

President Election News
Presidential Election: बैठकीपूर्वी ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा करु नये, असे उमर म्हणाले. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ममता यांनी बैठकीत दोन नावे सुचवली आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि दुसरे नाव फारुख अब्दुल्ला यांचे आहे. परंतु या नावांवर अद्याप चर्चा झालेली नाही. उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची 21 जून रोजी पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विरोधक एकत्रित उमेदवार उभे करणार आहेत

विरोधकांच्या बैठकीत संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला आहे. सत्ताधारी भाजप उमेदवाराच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यावर विरोधकांनी एकमताने सहमती दर्शवली आहे. “भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही एका मजबूत उमेदवाराला उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, जो खऱ्या अर्थाने राज्यघटनेचा संरक्षक असेल,” असे बैठकीनंतरच्या निवेदनात विरोधकांनी म्हटले आहे. मोदी सरकारने भारतीय लोकशाहीला हानी पोहोचवली असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे.

President Election News
Rajya Sabha Elections: कर्नाटकात भाजपची सरशी, कॉंग्रेसने जिंकली 1 जागा

तसेच, 18 जुलै रोजी होणार्‍या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 30 जून रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शेवटची तारीख 2 जुलै असणार आहे. 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

एनडीएकडून कोण उमेदवार असू शकतो

विरोधी पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेही उमेदवारांबाबत अद्याप मौन बाळगले आहे. भाजप राष्ट्रपती कोविंद यांना दुसर्‍या टर्मसाठी पुन्हा नामनिर्देशित करण्याची शक्यता नसताना, इतर अनेक उमेदवारांबद्दल अटकळ आहे.

President Election News
Presidential Election: तुम्हाला माहितीये का राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया, वाचा सविस्तर

अशा काही प्रमुख व्यक्ती आहेत ज्यांना निवडणूक लढवण्याची आणि देशाचे पुढील राष्ट्रपती बनण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

- आरिफ मोहम्मद खान

- द्रौपदी मुर्मू

- अनुसुईया उईके

- तमिळसाई सुंदरराजन

-सुमित्रा महाजन

- मुख्तार अब्बास नक्वी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com